पंकजा मुंडेंंना भाजपच्या राज्य कार्यकारीणीत स्थान नाही; नवी कार्यकारीनी जाहीर

मुंबई । पंकजा मुंडे भाजपच्या राज्य कार्यकारीणीत नाहीत. त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारीही पंकजा मुंडेंना दिली जाईल.

विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील. असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सर्वात महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती म्हणजे पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते म्हणून केशव उपाध्येंना जबाबदारी दिल्याचेही त्यांनी जाहीर केले.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना विधानपरिषद देखील नाकारण्यात आली होती. त्यामुळे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले होते.

पंकजा मुंडे यांना नेमकी कुठली जबाबदारी देण्यात येणार आहे याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.