Share

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं आले अंगलट; 13 जणांविरुद्ध कारवाई; काय घडलं ते जाणून घ्या

Pankaja Munde : बीडच्या (Beed) सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर 2 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या दसरा मेळाव्यादरम्यान भाजपच्या (Bharatiya Janata Party) मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर अनधिकृत मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 13 जणांविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी काही स्थानिक तरुणांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, रॅलीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. पोलिसांनी तरुणांना गाड्या पार्क करून सुरक्षित मार्गाने मेळाव्यासाठी जाण्याचे सांगितले. मात्र, काही युवकांनी पोलिसांशी उद्धट वर्तन केले, अरेरावी केली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. यानंतर अंमळनेर पोलीसांनी तत्काळ कारवाई करत 13 जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. या पोस्टरवर “We support walmik anna, कराड आमचे दैवत” असा मजकूर होता. कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर मेळाव्यात लावल्याने राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी यावर टीका करत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना वाल्मिक कराड बाबत आपले मत स्पष्ट करण्याची मागणी केली.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला असला तरी काही अनधिकृत रॅलीत सहभागी तरुणांच्या हुज्जतीमुळे पोलिस कारवाई अनिवार्य ठरली. यासोबतच वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे पोस्टर राजकीय चर्चेत ताप निर्माण करणारे ठरले.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now