पंकजा मुंडे यांनी केली नव्या राजकीय इनींगची घोषणा!

बीड । विधानसभेतील पराभवानंतर राजकारणापासून लांब असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा नव्याने राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत त्यांनी हा निर्धार केला आहे.

परदेशवारी झाल्यावर कोरोना संकट दूर झाल्यावर पुन्हा एकदा पूर्वीच्या झंझावाताप्रमाणे समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय त्यांनी केला. एका फेसबुक पोस्टद्वारे बऱ्याच कालावधी नंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावे लागणार आहे. त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे.

भाजपने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या राज्याच्या कार्यकारिणीमध्येही पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आले नाही. पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे.

त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. विधानसभेतील पराभवानंतर त्या पक्षात नाराज असल्याचे देखील बोलले जात होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.