इंधन दरवाढ थांबावी, महागाई नसावी, सामान्यांना अच्छे दिन यावेत हिच नरेंद्र मोदींची इच्छा – पंकजा मुंडे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक पार पडली. त्या बैठकीत आज पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. पंकजा मुंडेनी यावेळी नरेंद्र मोदींची स्तुती करत त्यांना पाठिंबा दिला.

महागाई नसावी हेच नरेंद्र मोदीचं ध्येय आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. राष्ट्रीय सचिव म्हणून मला असं वाटतं की या महागाईवर तोडगा निघायला हवा. महागाई नसली पाहिजे. सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असंच पंतप्रधानांचं ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

पुढे त्या म्हणाल्या की, निवडणुका लढण्यामागे भाजपचा एक हातखंडा आहे. मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तेथे प्रचाराला जाणार आहे. महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा असताना आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील समाजामध्ये तीव्र संताप आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठा आरक्षणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला हवे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

साखर उद्योगाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, अशा लोकांनी साखर उद्योगाला हाताळले आहे की त्यात नकारात्मकता आली आहे. अनेक उद्योग अडचणीत आल्यानंतर देशातील उद्योगपती ते हातात घेतात. त्यामुळे साखर उद्योगाकडेही त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे. साखर उद्योगाचे व्याज माफ केले पाहिजे. सरकारने कर्जाची हमी द्यायला हवी. यासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
गुलाबाच्या शेतीने कुटुंबाला गरीबीतून वर काढले; ४०० रूपये किलोने विकतात घरात बनवलेला गुलकंद
आर्यनला जेलमधील जेवन पचेना; अधिकाऱ्यांना सतावतेय आर्यनच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता
सतीश मानेशिंदेंची ‘ही’ चूक आर्यनला पडतेय महागात; प्रसिद्ध वकीलाने सांगीतले आर्यन अडकण्याचे कारण
आर्यनच्या बचावासाठी आता पाकिस्तानी मीडिया आक्रमक, म्हणाले केवळ मुस्लिम असल्याने टार्गेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.