Pankaja Munde : गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार व १२ खासदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. तसेच भाजपसोबत हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. त्यानंतर आता नुकताच या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केले आहे. ‘होय मी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलंय’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेता सुबोध भावे हा या कार्यक्रमाचा निवेदक आहे. “तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?” असा प्रश्न त्याने पंकजा मुंडेंना विचारला.
यावर उत्तर देताना, “होय मी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडे यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय, असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपात आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते.
गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते, तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायला लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारल्यावर तो सुखद अनुभव मला मिळाला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांना विविध राजकीय तसेच अराजकीय प्रश्न विचारण्यात आले होते. त्याची उत्तरे देताना विरोधी पक्षातील नेत्यांना फोडले असल्याची कबुली त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
BJP : सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूका झाल्यास भाजपचा पराभव नक्की; धक्कादायक आकडेवारी आली समोर
Pankaja Munde : मंंत्रिमंंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी केली व्यक्त; म्हणाल्या, मी पात्र…
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…
रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे केले तोंडूभरुन कौतूक, म्हणाले, फडणवीस साहेबांची….






