VIDEO; पंगा गर्ल कंगनाची पुन्हा चर्चा रंगली, भर पावसात करतेय जबरदस्त घोडेस्वारी

मुंबई। बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. सध्या गेले वर्षभर ती प्रत्येक विषयावर ती तीच मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. ती सध्या राजकारणातील विषयांवर टीका करत असल्याचे आपण पाहिले आहेच.

त्यामुळे तिची हि वादग्रस्त मतं मांडणं तिला वादाच्या भोवऱ्यातही अडकवून जातात. अशातच ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण हे तीच वादग्रस्त वक्त्यव्य नसून सोशल मीडियावरील एक भन्नाट व्हिडिओ आहे. कंगनाने मुंबईच्या पावसात केलेल्या नुकताच घोडेस्वारी करतानाचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तिचा हा घोडेस्वारीचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाचा सुपरहिट अंदाज दिसून येत आहे. रविवारचा वेळ प्रत्येकानं आपल्या परिनं व्यतीत केला. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या गोष्टीचा रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी आनंद घेत असतात. कंगनानंही या दिवसाला घोडेस्वारीनं खास बनवलं आहे.

या व्हिडिओत आपण पाहून शकतो की, नारंगी रंगाचं टीशर्ट, काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. अनेकांनाच तिच्या मणिकर्णिका या चित्रपटाची आठवणही झाली. जिथं कंगनानं झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला होता. या भूमिकेच्या निमित्तानं तिनं तलवारबाजी, घोडेस्वारी शिकली होती.

ही शकवणी कंगना अद्यापही विसरलेली नाही, याचीच प्रचिती तिचा नुकताच व्हिडीओ पोस्ट करताना लक्षात येत आहे. पावसाळ्याच्या परफेक्ट मोसमात घोडेस्वारीचा आनंद घेताना कंगना खूप खुश दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्या आहेत. व्हिडिओला लाखो लाईक्सही मिळाले आहेत. त्यामुळे आता कंगना पुन्हा चर्चेत आली आहे.

महत्वाच्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट, चर्चांना उधाण
हनिमूनला गेल्यावर पत्नीला बसला जबर धक्का; आता नवरा बनणार नवरी, वाचा पूर्ण प्रकरण
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केदार शिंदेंची खास पोस्ट; म्हणाले, एकदा या राजा माणसाच्या..
ऋषी कपूरने नीतू सिंगला हिऱ्याचा हार देत लग्नासाठी केले होते प्रपोज; वाचा त्यांची हटके लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.