दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारतीय डावाचे शेवटचे षटक सुरू होते. हार्दिक पांड्याने ५व्या चेंडूवर शॉट खेळला. दुसऱ्या टोकाला दिनेश कार्तिकला धाव घ्यायची होती, पण वेळ असतानाही हार्दिकने धाव घेण्यास नकार दिला. शेवटच्या चेंडूवर त्याला केवळ २ धावा करता आल्या.(Hardik Pandya, Arun Jaitley Stadium, T20, Cricket, Dinesh Karthik, Insult, Krinal Pandya)
ही बाब खूपच लहान वाटत असली तरी क्रिकेट चाहत्यांनी याला ३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी जोडले आहे. २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अशाच एका प्रसंगी, दिनेश कार्तिकने क्रुणाल पांड्यासोबत फलंदाजी करताना एक धाव घेण्यास नकार दिला. आता हार्दिक पांड्यावर आरोप केला जात आहे की, त्याने आपल्या भावासोबत घडलेल्या घटनेचा बदला दिनेश कार्तिककडून घेतला आहे.
वास्तविक, एनरिक नॉर्टजेने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऋषभ पंतला रसी व्हॅन डेर डुसेनकरवी झेलबाद केले. तो १६ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकचे प्रेक्षकांनी डीके, डीके, डीके.. असा जयघोष करत स्वागत केले.
In 2019 , Karthik denied single to Krunal
In 2022 , Hardik denied single to Karthik pic.twitter.com/8fUQ22QelB
— Kaygee (@Kaygee4_5) June 9, 2022
ज्या विध्वंसक शैलीत कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीसाठी अनेक सामने जिंकले त्यामुळे भारतीय संघाच्या चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिकला एकही धाव घेता आली नाही, तर दुसरा चेंडू यॉर्कर होता आणि त्यावर त्याने धाव घेतली. हार्दिक पंड्याने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला, तर पाचव्या चेंडूवर शॉट खेळला.
येथे दिनेश कार्तिक धाव घेण्यासाठी धावला, पण हार्दिक पांड्याने नकार दिला. हे विचित्र होते, कारण हार्दिककडे धावा काढण्यासाठी भरपूर वेळ होता. दुसऱ्या टोकाला कार्तिकला मोठा फटका मारता आला. त्यामुळे धाव नाकारण्याचे कोणतेही वैध कारण नव्हते, पण पंड्याने ते केले. शेवटच्या चेंडूवर त्याला २ धावा करता आल्या.
आता दिनेश कार्तिक आणि हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्या यांच्यात घडलेल्या घटनेबद्दल बोलूया. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर टिम साऊदीच्या चेंडूवर एक शॉट खेळला, पण त्याने धाव घेण्यास नकार दिला. इथे दुसऱ्या टोकाला होता कृणाल पांड्या. फॅनने हा सामना दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्याशी जोडला आहे.
महत्वाच्या बातम्या
त्याने कॅच सोडला म्हणून सामना हारलो नाही तर.., श्रेयस अय्यरच्या समर्थनार्थ इशान किशन मैदानात
‘त्यांचं ते थम्प्स अप कधीच विसरणार नाही’, जगतापांची एकनिष्ठता पाहून फडणवीस झाले भावूक
५९ पैशांचा शेअर २२०० रुपयांवर, १ लाखाचे झाले ३७ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?
छ्प्परफ़ाड रिटर्न! अदानीच्या ‘या’ शेअरने केले गुंतवणूकदारांना मालामाल, १ लाखाचे झाले ३७ कोटी