प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात तुमचाच विचार होता,पप्पा ही खेळी तुमच्यासाठीच’

टीम इंडियाविरूद्ध इंग्लंड एकदिवसीय सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडिअममध्ये खेळला गेला. भारताने धडाकेबाज फलंदाजी करत इंग्लंडला ३१८ धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने ६६ धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला आहे.

यामध्ये आपल्या वनडे पदार्पणातच कृणाल पंड्याने अर्धशतक झळकवले आहे. सामन्यात त्याने ३१ चेंडूमध्ये ५९ धावा चोपल्या आहेत. कृणालच्या या तुफान खेळीचं चाहत्यांसह त्याचा भाऊ हार्दिक पांड्यानेही कौतूक केले आहे.

कृणाल आणि हार्दिकच्या वडिलांचे जानेवारी महिन्यात निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या कृणाल पांड्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाला. अन् भर मैदानात ढसाढसा रडला आहे. त्यानंतर त्याने सोशल मिडियावर पोस्ट लिहिली आहे.

“प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात फक्त आणि फक्त तुमचाच विचार सुरू होता, पप्पा तुम्ही माझ्यासोबत आहात असे वाटत होते आणि त्यामुळे डोळे भरून आले होते.” “तुम्ही माझी ताकद आहात आणि मला तुमचा कायम पाठिंबा मिळत राहिला, त्यासाठी तुमचे आभार. ही खेळी तुमच्यासाठीच आहे आणि यापुढे आम्ही जे काही करू, तेही तुमच्यासाठीच असेल.”

 

इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात कृणाल पांड्याने के एल राहूल सोबत भागीदारी करून नाबाद खेळी केली. कृणाल पांड्याने ३१  चेंडूत २ षटकार आणि ७ चौकार ठोकले आहेत.

टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, प्रसिध्द कृष्णा, रोहित शर्मा. के.एल. राहूल, शार्दुल ठाकूर, भूवनेश्वर कुमार, शिखर धवन, कुलदीप यादव हे खेळाडू संघात आहेत. तर विराट कोहली संघाचा कर्णधार आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिधावाटप दुकानांवरील वॉच आता होणार अधिक कडक; दुकानदाराची करता येणार तक्रार
राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच अजब योगायोग! पत्नी झाली महापौर तर पती विरोधी पक्षनेता
कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.