पांड्या बंधूंनी मुंबईत घेतले ३० कोटींचे घर; एकेकाळी मॅगी खाऊन दिवस काढत होते

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू आयपीएलमधून ते बक्कळ पैसे कमवत असतात. यामध्ये हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेले आलिशान घर.

या दोघांनी आता मुंबईमध्ये आलिशान 8 BHK घर घेतले आहे. 3,838 स्क्वेअर फुटाचे हे घर आहे. हे घर खूपच मोठे आहे. पांड्या बंधूंनी रुस्तमजी पॅरामाऊंटमध्ये घेतलेल्या या घराची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. यामुळे हे घर कसे असेल याचा अंदाज आपल्याला येईल.

याबाबत डीएनएने वृत्त दिले आहे. हार्दिक आणि कृणालच्या घरामध्ये जिम, गेमिंग झोन, स्विमिंग पूल, तसेच त्यांच्या अपार्टमेंटमध्ये वैयक्तिक थिएटरही आहे. यामुळे या घरात सर्व सोयी उपलब्ध आहेत. यामुळे घराची किंमत खुपच जास्त आहे.

तसेच टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी पांड्या बंधूंचे शेजारी आहेत. त्याचे देखील तिथेच घर आहे. हार्दिक पांड्या एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मोठे षटकार लावण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तसेच क्षेत्ररक्षण देखील तो अचूक करतो.

आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो. त्याचे लग्न देखील झाले असून त्याला एक मुलगा आहे. पांड्या बंधु अतिशय गरीब परिस्तिथीमधून गेले आहेत. त्यांनी खडतर प्रवास करून इथपर्यंत मजल मारली आहे. सध्या ते श्रीलंका दौऱ्यावर आहेत. मात्र त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्या

गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात भरदिवसा हत्या; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात घातल्या गोळ्या

केवळ ८ मिनिटात चार्ज, एकदा चार्ज केली की धावते १००० किमी, या गाडीने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

कुंपनच शेत खातय! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन, वाळू उपसा करणाऱ्यांना करत होता मदत..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.