Share

Amravati : तुकाराम मुंढेचं भाषण ऐकून झाली प्रभावीत, रंगकाम करणाऱ्या कामगाराच्या मुलीने पास केली UPSC परीक्षा

Pallavi Chinchkhede

Amravati : अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे युपीएससी, एमपीएससीची तयारी करत असतात. त्यात काहींना लवकर यश मिळते, तर काहींना त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. अशाच एका मुलीने अनेक प्रयत्नानंतर युपीएससीच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. याच मुलीचा प्रवास आज आपण या लेखात पाहणार आहोत.

अमरावती येथील पल्लवी देविदास चिंचखेडे या तरुणीने अतिशय मेहनतीने युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे पल्लवीची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही. तिचे बाबा रंगकाम करतात, तर आई शिवणकाम करते. मात्र, तिने धीर न सोडता आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

पल्लवी लहान असताना तिचे वडील तिला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला घेऊन गेले होते. त्यावेळी तुकाराम मुंडेंचे भाषण ऐकून ती प्रभावित झाली. त्यानंतर तिने आपणही अधिकारी व्हायचे असे ठरवले आणि लहानपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न बघण्यास सुरुवात केली.

पल्लवीने युपीएससीची तयारी सुरु केली खरी, परंतु त्यासाठी तिला दिल्लीला जावे लागणार होते. त्याकरिता तिला खूप खर्च येणार होता. परंतु, घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे मग तिने अमरावतीतच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर तिला एका चांगल्या कंपनीत नोकरीही मिळाली.

मात्र, युपीएससीचे स्वप्न काही केल्या तिची पाठ सोडेना. त्यामुळे तिने ३ वर्ष नोकरी केली. त्यातून पैसे साठवून तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट दिल्ली गाठली. तिथे तिने युपीएससीची तयारी सुरु केली आणि अखेर त्यात तिला यश मिळाले. त्यामुळे तिने तिच्या आईवडिलांची मान उंचावली असल्याचे बोलले जात आहे.

युपीएससीच्या परीक्षेत पल्लवीला ६३ वे स्थान मिळाले आहे. शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये काम करण्याची ईच्छा तिने व्यक्त केली आहे. पल्लवीने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे समाजात सर्वच स्तरांमध्ये तिचे खूप कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या
मुंबई विमानतळावर सापडलं १५ कोटींचे सोन्याचं घबाड, ATS च्या हाती लागली धक्कादायक माहिती
Asia Cup: पुरुषांना नाही जमलं ते महिलांनी करून दाखवलं; ७ व्या वेळी पटकावला आशिया कप, श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव 
Rohit Sharma : पाकीस्तानविरूद्धच्या सामन्याचे महत्व आम्हालाही माहीत आहे, पण..; कट्टर चाहत्यांना रोहीतने झापले 
Harry Potter: सर्वांच्या आवडत्या हॅरी पॉटरच्या ‘हॅग्रीड’चे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; चाहत्यांवर शोककळा

 

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now