Share

कोरोनाबाधित पत्नीला वाचवण्यासाठी पतीने खर्च केले तब्बल १.२५ कोटी आणि मग…

pali-rajsthan-husband-wife-love-story

जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने नवनवीन प्रेमकथा समोर येत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जीवनाची भेट दिली आहे. पाली जिल्ह्यातील डॉक्टर सुरेश चौधरी यांनी आपल्या पत्नीला वाचवण्याचा निर्धार केला होता. या डॉक्टरने आपले सर्वस्व पणाला लावून आजाराने ग्रस्त असलेल्या पत्नीला मरणाच्या दारातून परत आणले आहे.(pali doctor husband save his wife)

कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी यांनी केवळ पदवीच गहाण ठेवली. पत्नीच्या उपचारांसाठी या डॉक्टरने १.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आज सर्वत्र या जोडप्याचीच चर्चा सुरु आहे. सुरेश चौधरी (३२) हे मूळचे पाली जिल्ह्यातील खैरवा गावचे आहेत. सुरेश गावात आपल्या पत्नी अनिता उर्फ ​​अंजू आणि पाच वर्षांच्या मुलासह राहतात.

गेल्या वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली होती. डॉक्टर सुरेश यांची पत्नी अनिता यांना खूप ताप आला होता. कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर काही वेळाने त्यांची तब्येत बिघडली. अशा परिस्थितीत सुरेश यांनी आपल्या पत्नीसह बांगर हॉस्पिटल गाठले. मात्र तेथे त्यांना बेड मिळाला नाही. सुरेश यांच्या पत्नीची प्रकृती सतत खालावत चालली होती.

त्यानंतर सुरेश पत्नीसह जोधपूर येथील एम्स रुग्णालयात पोहोचले. याठिकाणी पत्नीला उपचारांसाठी दाखल झाले. सुरेश हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. ज्यावेळी त्यांच्या पत्नीची तब्येत बिघडली होती, त्यावेळी देशात कोरोना शिगेला पोहोचला होता. त्यामुळे सुरेश यांना सुट्ट्या मिळत नव्हत्या. त्यामुळेच ते आपल्या पत्नीला एका नातेवाईकाकडे सोडून पुन्हा ड्युटीवर रुजू झाले. दरम्यान अनिता यांची प्रकृती अधिकच बिघडल्याची माहिती सुरेश यांना मिळाली.

त्यांची फुफ्फुसे ९५ टक्के खराब झाली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अनिता यांचे जगणे खूप कठीण आहे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अशा परिस्थितीतही सुरेश यांनी हार न मानता पत्नी अंजूसह अहमदाबादला गेले. तेथे सुरेश यांनी आपल्या पत्नीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अनिता यांच्या शरीरात रक्ताची तीव्र कमतरता होती.

यामुळे त्यांना ईसीएमओ मशीनवर घेण्यात आले. पत्नीच्या उपचारासाठी सुरेश यांनी सर्वस्व पणाला लावले. उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी सुरेश यांनी आपली एमबीबीएसची पदवी गहाण ठेवली आणि बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले. सुरेश यांनी स्वतः बचत केलेले १० लाख रुपये देखील आपल्या पत्नीच्या उपचारासाठी खर्च केले. याशिवाय सुरेश यांनी त्यांचे मित्र आणि सहकारी डॉक्टरांकडून २० लाख रुपये घेतले. त्याचवेळी त्यांनी त्यांचा एक प्लॉट १५ लाख रुपयांना विकला आणि इतर नातेवाईकांकडून देखील पैसे घेतले.

महत्वाच्या बातम्या :-
गुगलवर कॉल गर्ल सर्च करणे आले अंगलट, तरूणाची झाली मोठी फसवणूक, घडली अद्दल
बाळाचं नाव पंतप्रधान ठेवणं दाम्पत्याला पडलं महागात; जाणून घ्या नक्की काय घडलं
चमत्कार! एचआयव्ही पॉझिटीव्ह महिलेने विषाणूवर केली मात, संशोधकांनाही बसेना विश्वास

इतर

Join WhatsApp

Join Now