१६ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील पालघरमध्ये जमावाकडून दोन हिंदू साधू आणि एका ड्रायव्हरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई(Mumbai) उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणात एक महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे. पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरणातील दहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.(palghar sadhu murder case 10 accussed get bail)
आरोपींची ओळख न पटल्यामुळे २५ हजारांच्या जातमुचल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणातील अन्य आठ आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या आठ आरोपींचा पालघर हल्ल्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नाकारला आहे.
या याचिकेवर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या की, “दहा आरोपींना या प्रकरणात जबाबदार धरता येईल असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे या दहा आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.” जामीन मंजूर झालेल्यांमध्ये राजू गुरुड, विजय पिलाना, रिशा पिलाना, दीपक गुरुड, सीताराम राठोड, विजय गुरुड, रत्ना भवर, ईश्वर निकोळ, फिरोज साठे आणि मोहन गावित या व्यक्तींचा समावेश आहे.
घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आठ आरोपी साधूवर हल्ला करताना दिसत होते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने या आठ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या आठ आरोपींमध्ये राजल गुरुड, महेश गुरुड, लहान्या वालाकर, संदेश गुरुड, हवासा साठे, भाऊ साठे, रामदास राव आणि राजेश राव यांचा समावेश आहे.
१६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाजवळ चोरटे परिसरात फिरत असल्याच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाने दोन हिंदू साधू आणि एका ड्रायव्हरवर हल्ला केला होता. या हल्ल्यात चिकने महाराज कल्पवृक्षगिरी, सुशीलगिरी महाराज आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण राज्य गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं. या प्रकरणात अनेक जणांना अटक करण्यात आलं आहे. पालघर हत्याकांड प्रकरणात राज्य सरकारने दोन अहवाल मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केले होते. या प्रकरणात काही आरोपींनी जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
समाजाची दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर, कोल्हेंची काश्मीर फाइल्सवर टीका
लग्नानंतर सकारात्मक उर्जा घरात घेऊन आली वहिनी, कतरिनाच्या दिराने केले तोंडभरून कौतुक
वाढदिवस विशेष: अजय देवगणकडे आहे ८४ कोटींचे जेट, मुंबईमध्ये आहे आलिशान बंगला, संपत्ती वाचून हादराल