“पाकच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारचा बुरखा फाडला”

मुंबई | कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने शनिवारी दिली होती. मात्र पाकिस्तान सरकार २४ तासात आपल्या विधानावरून पलटले आहे.

आता या प्रकरणावर जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानेच पाकिस्तानचा बुरखा फाडला, असे वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने दाऊद इब्राहिमचे वेगवेगळ्या नावाने बनवलेले अनेक पासपोर्ट, नॅशनल आयडेंटिटी नंबर जाहीर केले आहे.

मात्र हे जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली असावी. त्यामुळेच पाकिस्तानने आता आपल्या विधानावरून घुमजाव केले आहे. पाकिस्तान सरकारवर आयसीस आणि पाकिस्तानी लष्करचे प्रचंड दडपण आहे. त्याची ही प्रत्यक्ष पावती आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

तसेच एखाद्या जोकरप्रमाणे पाकिस्तान कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहे. पाकिस्तानने या आधीही अनेकवेळा खोटारडेपणा केला आहे, असा टोलाही उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानच्या सरकारला लगावला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.