भारताविरुद्ध पाकिस्तानचे मोठे षडयंत्र; चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जनपिंगला पाकिस्तानचे ‘तीन’ मोठे प्रस्ताव

 

इस्लामाबाद | पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी चीनचा एकदिवसीय दौरा केला असून हा या दौऱ्यात पाकिस्तानने चीन समोर तीन प्रस्ताव मांडले आहे.

महमूद कुरेशी यांनी घेतलेली ही भेट खूप महत्वाची म्हटली जात आहे. या भेटीचा उद्देश पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे ध्येय दर्शविणे आहे, असे महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सैन्य सहकार्यासह तीन प्रस्तावांसाठी चीनला गेले आहे. यापूर्वी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मागील वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षण सहकार्य आणि क्षमता वाढविण्यासाठी पाकिस्तान लष्कराबरोबर करार केला होता.

पाकिस्तानच्या लष्कराला पीएलएसोबत असलेले संबंध आणखी मजबूत करायचे आहे असे म्हटले जात आहे, तसेच संयुक्त सैन्य आयोग तयार करण्याची त्यांची इच्छा आहे.

पाकिस्तान लष्कराचा यामागचा हेतू असा आहे की दोन्ही सैन्यांमध्ये एकसारखा निर्णय घेऊ शकता येईल. ज्यामुळे पीएलए आणि पाकिस्तान सैन्य एकत्र येऊ शकेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.