Share

Arshad Nadeem: भालाफेकमध्ये पाकच्या अरशद नदीमने जिंकले गोल्ड, नीरज चोप्राची ही होती रिऍक्शन, म्हणाला..

Arshad-Nadeem

अरशद नदीम (Arshad Nadeem) : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये इतिहास रचला. त्याने येथे भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानसाठी भालाफेकमधील हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.(Javelin, Arshad Nadeem, Jinkle Gould, Anderson Peters, Pakistan, Neeraj Chopra)

यासोबतच गेल्या ५६ वर्षांतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्स स्पर्धेत पाकिस्तानचे हे पहिले पदक आहे. अर्शद नदीमने ९०.१८ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले आहे. आजपर्यंत नीरज चोप्रालाही ९० मीटर भालाफेक करता आलेली नाही.

नीरज चोप्रा दुखापतीमुळे यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सकडून सुवर्ण जिंकण्याची अपेक्षा होती. अँडरसन पीटर्सने ८८.६४ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले होते पण अर्शदने पाचव्या प्रयत्नात ९०.१८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.

अँडरसन पीटर्सला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचे कांस्यपदक केनियाच्या येगोला मिळाले. त्याने ८५.७० मीटर भालाफेक केली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पाकिस्तानला अॅथलेटिक्समध्ये गेल्या ५६ वर्षांत एकदाही पदक मिळवता आलेलं नाही. पाकिस्तानला शेवटची वेळ १९६६ मध्ये अॅथलेटिक्समध्ये पदक मिळाले होते.

अशा परिस्थितीत नदीमचे हे पदक राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तानचा पाच दशकांचा दुष्काळ संपवणार होते. कॉमनवेल्थ गेम्समधील भालाफेकमध्ये हे पहिले पाकिस्तानी सुवर्ण ठरले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ८७.५८ मीटरवर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.

यापूर्वी तो राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकला होता, पण त्याची फेक कधीच ९० मीटरच्या पुढे जाऊ शकली नाही. नीरजचे वैयक्तिक सर्वोत्तम ८९.९४ मीटर आहे, जे त्याने यावर्षी स्टोखोल्म डायमंड लीगमध्ये गाठले.

महत्वाच्या बातम्या
Akshay Kumar: सिनेमा पाहायचा नसेल तर पाहू नका पण.., बॉयकॉट रक्षाबंधनच्या ट्रेंडवर अक्षयचे रोखठोक वक्तव्य
the parrot : ..त्यामुळे पोपटाच्या विरोधात वृद्धाने थेट पोलिसांत केली तक्रार, पुण्यातील विचित्र प्रकरण
Eknath Shinde : संतोष बांगर शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत का थांबले होते? ; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now