Homeआंतरराष्ट्रीयतालिबान्यांचे 'ते' रुप पाहून पाकिस्तानी सैनिकांची उडाली घाबरगुंडी, हल्ला न करताच गेले...

तालिबान्यांचे ‘ते’ रुप पाहून पाकिस्तानी सैनिकांची उडाली घाबरगुंडी, हल्ला न करताच गेले पळून

पाकिस्तानने ज्या तालिबानला उभे केले त्यानेच आता पाकिस्तानची हवा काढली आहे. आता तेच तालिबान पाकिस्तानसाठी घृणास्पद असल्याचे सिद्ध झाले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानी सैनिकांमध्ये आठवड्यात दुसऱ्यांदा चकमक झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षाचे कारण म्हणजे ड्युरंड लाइन. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील २६०० किमी लांबीच्या सीमेला ड्युरंड लाइन म्हणतात. अफगाणिस्तानात राहणारे तालिबान आणि पश्तून या सीमेला मानत नाहीत. याचे कारण अफगाणिस्तानातील अनेक पश्तूनबहुल भाग या सीमारेषेद्वारे पाकिस्तानात सामील झाले होते. त्यानंतर आता पश्तून दोन देशांमध्ये विभागले गेले आहेत.

२२ डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांतात १० किमी आत घुसून काटेरी तार लावत होते. यास तिथे तैनात असलेल्या तालिबानी सैनिकांनी विरोध केला. पण, पाकिस्तानी लष्कर ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तालिबान सैनिकांनी तारा आणि खांब उखडून टाकले.

वृत्तानुसार, तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना धमकी दिली की, जर त्यांनी पुन्हा कुंपण घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. ही घटना अफगाणिस्तानच्या निमरोज प्रांतात घडली आहे. यावेळी तालिबान्यांचा रोष पाहून पाकिस्तान सैनिक पळून गेल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सीमेवर कुंपण घालण्याचा मुद्दा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सतत संघर्षाचे कारण बनला आहे. अफगाणिस्तानचे करझाई सरकार आणि अश्रफ घनी सरकारही या मुद्द्यावर पाकिस्तानवर सातत्याने आक्षेप घेत आहेत. अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की ड्युरंड रेषा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आली आहे आणि त्यांचा काही भाग बेकायदेशीरपणे पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची सत्ता काबीज करणाऱ्या तालिबाननेही या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. अफगाण भागात बळजबरीने कुंपण घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फटका आपल्याला सहन करावा लागेल, असे त्यांनी पाकिस्तानी लष्कराला स्पष्ट केले आहे. त्याचवेळी तेहरिक तालिबान पाकिस्तानच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या
पळून जाणाऱ्या मुलींची हत्या होते नाहीतर त्यांना वेश्या व्यवसायाला लावले जाते.. डीजीपींच्या विधानाने खळबळ
Only 007! BMW पासून मर्सिडीझपर्यंत उदयनराजेंच्या ताफ्यात अजून कोणत्या आहेत गाड्या? जाणून घ्या..