सध्या ऑस्ट्रेलियन(Australia) संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तान(Pakistan) आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघामध्ये रावळपिंडी (Ravalpindi) क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करत आहे.(pakistani player video viral from austrlia match)
ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी एक रंजक घटना घडली आहे. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या एका खेळाडूची पॅन्ट फाटली. त्या खेळाडूचे नाव शान मसूद असं आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानचा शान मसूद हा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना त्याची पॅन्ट अचानक फाटली. cricket.com.au ने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/cricketcomau/status/1500799290754547716?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1500799290754547716%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Faustralia-vs-pakistan-1st-test-shaan-masood-instance-pak-player-tspo-1423735-2022-03-07
त्यानंतर पाकिस्तान संघाने ४ बाद ४७६ धावा करून पहिला डाव घोषित केला होता. या सामन्यात पाकिस्तानच्या अझहर अलीने १८५ धावांची झंझावाती खेळी केली होती. तसेच पाकिस्तानच्या इमाम-उल-हकने १५७ धाव केल्या होत्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली होती. या दोघांच्या खेळीमुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करता आली.
पण ऑस्ट्रेलियन संघाने देखील पाकिस्तान संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ऑस्ट्रेलियन संघातील डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी १५६ धावांची शानदार भागीदारी केली होती. या भागीदारीमध्ये ख्वाजाने ९७ आणि वॉर्नरने ६८ धावांचे योगदान दिले होते.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघातील मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी चांगली खेळी केली. लॅबुशेनने ९० आणि स्टीव्ह स्मिथने ७८ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीन ४८ धावा करून बाद झाला. सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या ४४९ होती आणि ऑस्ट्रेलियन संघाचे सहा गडी बाद झाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय शिर्डी देवस्थानच्या विश्वस्तांच्या घरी आयकर विभागाची धाड, राजकीय वर्तुळात खळबळ
गप्प बसलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी.., मोदी सरकारबाबत मलिकांचा खळबळजनक खुलासा
‘आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट’; महेश टिळेकरांचा मराठी कलाकारांना टोला