जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या अनेक घटना घडत आहेत. दहशतवाद्यांकडून काश्मिरी हिंदू नागरिकांची हत्या केली जात आहे. या घटनांमुळे काश्मिरी पंडित आणि इतर हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून पलायन करण्याची घोषणा केली आहे.( pakistani player mohmad rizwan talk about indian player want play series with pakistan )
या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवानने(Mohmad Rizwan) एक विधान केलं आहे. या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना देखील पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळायची आहे, असे विधान मोहम्मद रिझवानने केलं आहे.
यामुळे नेमक्या कोणत्या भारतीय खेळाडूला पाकिस्तानसोबत मालिका खेळायची आहे? का रिझवानचा हेतू केवळ आग लावण्याचा आहे, ही शंका उपस्थित केली जात आहे. “पाकिस्तान आणि भारताच्या क्रिकेटपटूंना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे, परंतु मालिका ठरवणे आणि देशांमधील समस्या सोडवणे हे खेळाडूंच्या नियंत्रणात नाही”, असे पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान म्हणाला आहे.
एका कार्यक्रमात मोहम्मद रिझवान याने हे वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोणत्या भारतीय खेळाडूला पाकिस्तानसोबत मालिका खेळायची आहे? हा प्रश्न मोहम्मद रिझवानच्या वक्तव्यानंतर भारतीय चाहत्यांना पडला आहे. मोहम्मद रिझवानला नक्की कोणत्या भारतीय खेळाडूकडे बोट दाखवयाचे आहे?
काही दिवसांपूर्वी भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजाराने मोहम्मद रिझवानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच मोहम्मद रिझवान आणि चेतेश्वर पुजारा यांनी एकत्रित नुकतीच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धा खेळली. यानंतर मोहम्मद रिझवान हे वक्तव्य केलं आहे. रिझवानने केलेले विधान पुजाराच्या विरोधात जाऊ शकते.
पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याला भारतीय चाहत्यांचा रोष पत्करावा लागू शकतो. यापूर्वी युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्यावर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचे समर्थन केल्याबद्दल टीका झाली होती. पाकिस्तानी खेळाडूंना भारतासोबत क्रिकेट सामने खेळले जावेत असे वाटते. पण संधी मिळताच ते गिरगिटासारखे रंग बदलतात. काश्मीर प्रश्नात पाकिस्तानी खेळाडू नेहमीच भारताच्या विरोधात विधान करतात. त्यामुळे मोहम्मद रिझवान देखील पुढे जाऊन इतर पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे भारताविरोधात गरळ ओकू शकतो, असे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आघाडीच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं चर्चेत नेमकं काय घडलं?
“भारतीय क्रिकेटपटूंना देखील पाकिस्तानसोबत क्रिकेट सिरीज खेळण्याची इच्छा आहे”
‘फॅन फॉलोईंग वाढावी म्हणून आकाश चोप्रा काहीपण बरळत असतो’; संतापलेल्या पोलार्डचा तडाखा