Share

केकेच्या निधनानंतर पाकीस्तानही बुडाला दुखात, सोशल मिडीयावर चाहत्यांच्या भावूक प्रतिक्रीया; पहा नेमकं काय म्हणालेत..

प्रसिद्ध गायक केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे निधन झाले. गायक केके ५३ वर्षांचे होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये केके यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमादरम्यान गायक केके (KK) यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात गायक केके यांचा मृत्यू झाला आहे. (pakistani fans react on tweeter after KK death)

या घटेनमुळे गायक केके यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी, गायकांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राजकीय नेत्यांनी देखील गायक केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक केके यांच्या निधनावर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “केके म्हणून प्रसिद्ध असलेले कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांशी संबंधित असलेल्या अनेक भावनांचे चित्रण होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.”

गृहमंत्री अमित शहा यांनी देखील केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विट केले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “‘केके हे अतिशय प्रतिभावान आणि अष्टपैलू गायक होते. त्यांच्या अकाली निधनाने भारतीय संगीताचे मोठे नुकसान झाले आहे.” केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “‘काही आवाज कधीच मरत नाहीत.”

पाकिस्तानमधून देखील गायक केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानी पत्रकार दिनो अली यांनी ट्विट करत गायक केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “तुम्ही किशोरवयापासून ते तारुण्यापर्यंत माझ्या साउंडट्रॅकमध्ये होता. त्या आठवणी, संगीत आणि आवाज यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. धन्यवाद सर. पाकिस्तानी चाहत्याकडून तुम्हाला खूप प्रेम”, अशा आशयाचे ट्विट पाकिस्तानी पत्रकार दिनो अली यांनी केलं आहे.

झाकी खालिद नावाच्या युजरने ट्विट करत लिहिले की, “माझ्यासह पाकिस्तानमध्ये केकेचे खूप मोठे आणि समर्पित चाहते आहेत. संगीत जगताचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.” भारतीय गायक आणि संगीत दिग्दर्शक सलीम मर्चंट यांनी ट्विट करत लिहिले की, “माझा भाऊ केके. मी नि:शब्द आहे. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलास.”

https://twitter.com/misterzedpk/status/1531707491939143680?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1531707491939143680%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.bbc.com%2Fhindi%2Fentertainment-61655511

महत्वाच्या बातम्या :-
फिल्टरपाडाच्या झोपडपट्टीत राहणारा गौरव मोरे कसा झाला हास्यजत्रेचा स्टार, वाचा यशोगाथा
मामाची मेहनत ‘अशी’ आली फळाला, UPSC पास करत भाचा झाला मोठा अधिकारी, वाचा यशोगाथा
आपल्या पूर्वजांची माहिती, वंशावळ जपून ठेवणारा ‘भाट’ नेमका आहे तरी कोण? माहिती वाचून आश्चर्य वाटेल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now