Pakistan Test Squad vs South Africa : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship 2025–27) चा भाग आहे. या संघाचे नेतृत्व शान मसूद (Shan Masood) करणार आहे, तर नवखे खेळाडू आसिफ आफ्रिदी (Asif Afridi), फैसल अख्तर (Faisal Akhtar) आणि रोहेल नजीर (Rohel Nazir) यांना संघात संधी मिळाली आहे.
पहिली कसोटी 12 ते 16 ऑक्टोबरदरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर, तर दुसरी 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आशिया कप 2025 मधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी ऑलराउंडर सॅम अयुब (Sam Ayub) आणि वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf) यांना संघातून बाहेर काढण्यात आले आहे. वर्षाच्या सुरुवातीला टाचेला झालेल्या दुखापतीपूर्वी अयुब नियमित सदस्य होता, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या 18 जणांच्या संघात त्याला स्थान मिळालेले नाही.
सॅम अयुबची आशिया कपमधील फलंदाजी निराशाजनक ठरली. त्याने खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यातील 21 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती, तरी संघाला पराभव पत्करावा लागला. गोलंदाजीत मात्र त्याने 8 गडी बाद केले. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सातव्या षटकात टाचेला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यायावे लागले आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर राहिला.
हारिस रौफच्या गोलंदाजीने भारताविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी आव्हानात्मक ठरला. केवळ 50 धावा देऊन एकही गडी घेतले नाही. तसेच आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्ध गैरप्रदर्शन केल्यामुळे निवड समितीने त्यालाही संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका कसोटी संघ शान मसूद (कर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, आसिफ आफ्रिदी, बाबर आझम, फैसल अक्रम, हसन अली, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नोमान अली, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी.