IPL मुळे नावाजलेल्या भारतीय टीमला पाकिस्तान यावेळी धडा शिकवेल, पाकिस्तानच्या खेळाडूची दर्पोक्ती

टी-20 विश्वचषकामध्ये आता भारत- पाकिस्तान हा सामना एकाच दिवसावर येऊन ठेपला आहे. यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या होणाऱ्या या सामन्याची तिकिटे दोन आठवड्यांपूर्वीच विकली गेली आहेत. काही भाग्यवान चाहत्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे.

भारत आणि पाकिस्तानचे चाहते सामन्याचा आनंद घेण्यासाठी दुबईत पोहोचत आहेत. चाहत्यांची गर्दी वाढल्याने हॉटेल्स पूर्णपणे भरली आहेत. असे असताना हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अनेकजण वेगवेगळे भाष्य करत आहेत.

आता पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर मुद्दसर नजर याने या सामन्यावर मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, की आयपीएलमुळे भारत क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. असे असताना देखील पाकिस्तान भारताला या सामन्यात हरवेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तो म्हणाला, आता पाकिस्तान क्रिकेट बदलले आहे. भारतही जगातल्या टॉप तीन टीममध्ये आहे. तो म्हणाला की पाकिस्तान प्रीमियर लीगमधून पाकिस्तानची टीम जगातील सर्वात ताकदवान टीम बनेल, असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान आता या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या ३० मिनिटांत सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली. प्रतिक्षा यादी देखील १३ हजार पार गेली आहे. अनेक वेबसाइटवर तिकिटे ४ ते ५ पट अधिक किमतीत विकली जात आहेत. सर्वात महागडी तिकिटे सुमारे २ लाख रुपये इतकी आहेत.

स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि बीसीसीआयच्या विनंतीनंतर यूएई सरकारने हा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे सामन्यांना प्रेक्षक दिसत असून अशात भारत विरुद्ध पाकिस्तान ही इतक्या वर्षांची लढत पाहण्यासाठी दोन्ही देशांच्या चाहत्यांसह इतरही क्रिकेटप्रेमी जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.