मदतीसाठी येणाऱ्या ट्रकवर पाकिस्तानचा झेंडा पाहून तालिबानी भडकले; पाकीस्तानची अशी जिरवली की..

तालिबान्यांनी अफगानिस्तानवर चढाई करून आपल्या ताब्यात घेतल्यावर जेवढे तालिबानी खुश नसतील झाले तेवढा जल्लोष पाकिस्तानी लोकांनी केला. पाकिस्तान जरी तालिबानी लोकांना अतिथी देवो भव अश्या स्वरुपात पहात असेल तरी तालिबानी पाकिस्तानला कवडी मोलाचा भाव देत नसल्याची चर्चा एका वायरल व्हिडिओ नंतर सुरू झाली आहे.

पाकिस्तानचा झेंडा असलेल्या ट्रकवरून तालिबानी हा झेंडा काढतानाचा हा व्हिडिओ असून सध्या या व्हिडिओवरून पाकिस्तानला चांगलाच ट्रोल केला जात आहे.

सदर व्हिडिओ हा अफगानिस्तान पाकिस्तान सीमालगतचा असल्याचे म्हंटले जात आहे. पाकिस्तानमधून मदतीचं सामान घेऊन येणाऱ्या ट्रकवरती पाकिस्तानचा झेंडा लावला होता. ट्रकच्या पुढच्या बाजूला अफगानिस्तान पाकिस्तान असेल लिहिले होते.

मात्र ट्रकच्यावरती पाकिस्तानचा लावलेला झेंडा तालिबानी लोकांना आवडलेला नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा पाकिस्तानी झेंडा का लावला आहे असा जाब विचारत तो झेंडा तोडताना तालिबानी सैन्य दिसून येत आहे.

त्यासोबतच ट्रक चालकाला दमदाटी करत आणि तिथे आरडाओरडा करताना सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाकिस्तान अफगाणिस्तान को ऑपरेशन फोरम असे ट्रकच्या पुढील बाजूस लिहिले होते. सदर घटनेमुळे तालिबानी पाकिस्तानला किती किंमत देतात हे समजते.

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावं अशी इच्छा व्यक्त केली होती त्यावर पाकिस्तानी लोकांनी बोलण्याचा काही एक अधिकार नाही असे तालिबानने ठणकावून सांगितले होते. त्यामुळें आता चीन सारखाच तालिबानी देखील आपल्याला जवळ करतील अशी अपेक्षा पाकिस्तानने हा व्हिडिओ पाहून तरी करूच नये.

 

महत्वाच्या बातम्या
न्युझिलंडचा दौरा रद्द करण्यामध्ये भारताचा हात; पाकिस्तान म्हणतंय, महाराष्ट्रातून आला धमकीचा ई-मेल
निवडणूक लढायची असेल तर कमीत कमी १० झाडं लावा, नाहीतर निवडणूक लढता येणार नाही 
नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणारे IPS दीपक पांडे पुन्हा चर्चेत, गोदास्नानात झाले मग्न..
महानायक अमिताभ बच्चन झाले मराठमोळ्या काॅमेडीकिंग समीर चौगुले समोर नतमस्तक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.