Share

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा सौदी अरेबियात अपमान, मशिदीच घुसताच लोकं म्हणाले, ‘चोर-चोर’

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ(Shahbaaj Sharif) हे त्यांच्या पहिल्या तीन दिवसीय परदेश दौऱ्यानिमित्त सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. आपण या ठिकाणी त्यांचे स्वागत अत्यंत विचित्र पद्धतीने करण्यात आले. सौदी अरेबिया दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मदिना येथील मस्जिद-ए-नवाबीला भेट दिली.(pakistan prime minister insulted in saudi arebia)

यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविरोधात ‘चोर-चोर’च्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी शिष्टमंडळ मशिदीत प्रवेश करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोक ‘चोर-चोर’ अशा घोषणा देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घोषणा देणाऱ्या लोकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मदिना येथील मस्जिद-ए-नवाबीला भेट देताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत माहिती मंत्री मरियम औरंगजेब आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य शाहझैन बुग्ती हे देखील उपस्थित होते. माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी या घटनेसाठी पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना जबाबदार धरले आहे.

https://twitter.com/RealYasir__Khan/status/1519719969956798467?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1519719969956798467%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fworld%2Fuae%2Fwatch-video-pakistani-pm-shehbaz-sharif-first-saudi-arabia-visit-arrived-madina-people-greeted-with-chor-chor-slogan%2Farticleshow%2F91168454.cms

ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानी यूजर्सनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या घटनेवरून माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी नाव न घेता इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. “मी या पवित्र भूमीवर त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही. कारण मला या भूमीचा राजकारणासाठी वापर करायचा नाही. पण त्यांनी समाज उध्वस्थ केला आहे”, असे माहिती मंत्री मरियम औरंगजेब म्हणाले.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक पाकिस्तानी यूजर्सनी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “बघा, सौदी अरेबियामध्ये आमचे पंतप्रधान आणि गुन्हेगारी टोळी पीडीएमचे किती जंगी स्वागत होत आहे.” सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

त्यांच्यासोबत कॅबिनेट सदस्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे. गुरुवारी सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी शरीफ यांनी ट्विट केले की, “आज मी बंधुत्वाच्या आणि मैत्रीच्या संबंधांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सौदी अरेबियाला जात आहे. सौदी अरेबिया आमचा चांगला मित्र आहे. दोन पवित्र स्थानांचे (मक्का आणि मदिना) संरक्षक म्हणून आमच्या हृदयात त्यांचे विशेष स्थान आहे”, असे ट्विट पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
…तेव्हापासून राज माझ्यामागे लागला; शर्मिला ठाकरेंनी सांगीतली लव्हस्टोरी, वाचून चकीत व्हाल
एडल्ट फिल्म शुट करताना उर्फी जावेदला पोलिसांनी रंगेहात पकडलं? जाणून घ्या संपुर्ण सत्य
‘शिवसेनेने हिंदूत्व सोडलं म्हणून मी शिवसेना सोडतोय’ म्हणत माजी खासदाराने केला भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now