पाकिस्तानचे(Pakistan) पंतप्रधान इम्रान खान(Emran Khan) यांनी रविवारी इस्लामाबादमधील २२ पाश्चिमात्य राजदूतांना फटकारले आहे. गेल्या आठवड्यात २२ पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाश्चात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर संतापले आहेत.(Pakistan prime minister emran khan angry on other coutries)
‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?’, असा सवाल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाश्चिमात्य देशांच्या राजदूतांना केला आहे. युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी १ मार्च रोजी एक संयुक्त पत्र जारी केले होते. या पत्रात रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेतील ठरावाला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानला आवाहन करण्यात आले होते.
हे पत्र राजनैतिक अधिकाऱ्यांनी जाहीरपणे प्रसिद्ध देखील केलं होतं. युरोपियन युनियनने घेतलेल्या मतदानात पाकिस्तानने तटस्थ भूमिका घेतली होती. संयुक्त राष्ट्र संघाने या महासभेत युक्रेनवर आक्रमण केल्याप्रकरणी रशियाला जोरदार फटकारले होते. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका राजकीय सभेत प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्या सभेत म्हणाले की, “तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटते? आम्ही तुमचे गुलाम आहोत का… तुम्ही म्हणता ते आम्ही करू? असं तुम्हाला वाटतं का?”, असा प्रश्न इम्रान खान यांनी उपस्थित केला आहे. या भाषणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा देखील उल्लेख केला.
आपल्या भाषणात इम्रान खान यांनी पाश्चिमात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनाही विचारले की, तुम्ही भारतालाही असेच पत्र लिहिले आहे का? भारताने देखील संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत या विषयावरील मतदानात भाग घेतला नाही.” इम्रान खान पुढे म्हणाले की, युक्रेनमुळे पाकिस्तानला नुकसान झाले आहे. कारण युक्रेनने अफगाणिस्तानमध्ये ‘नाटो’ला समर्थन दिले होते.”
पाकिस्तान कोणत्याही गटबाजीत गुंतलेला नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सभेत सांगितले. यावर पाश्चिमात्य देशांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या अकरा दिवसांपासून युक्रेन आणि रशियामध्ये भयंकर युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
तीन मजली इमारतीत झाला भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यु, बॉम्ब बनवत असल्याचा शेजाऱ्यांचा आरोप
मोलकरणीने हार्पिक आणि झंडू बामपासून बनवला आय ड्रॉप, ७३ वर्षीय महिलेला केले आंधळे; कारण वाचून हादराल
पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा






