पाकिस्तानचे मौलाना तारिक जमील झाले सलमानचे फॅन; म्हणाले, स्वर्गाच्या वाटेने जातोय सलमान खान

पाकिस्तानमधील सतत चर्चेत असलेले मौलाना तारिक जमील यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, सलमानचे वडील सलीम खान आणि कुटूंबाला ईदच्या शुभेच्छा.

तसेच ते म्हणाले, सलमान सारखा आज्ञाकारी मुलगा त्याच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. मौलाना जमील म्हणाले, येवढा मोठा सेलिब्रिटी असला तरी सलमान नोकरासारखी घरच्यांची सेवा करतो. त्यांच्या घरचे भाग्यवान आहेत.

तसेच जमील म्हणाले, क्रिकेटर शोएब अख्तरने सलमानबद्दल त्यांना काही सांगितले त्यामुळे मी सलमानचा फॅन झालो. पहिली गोष्ट मुलाच्या जागेवर सलमान खान आज्ञाधारी आहे. त्याला काही चांगले करायला सांगितले तर तो नाही म्हणत नाही.

हा स्वर्गाचा रस्ता आहे, जो आपल्या आईवडिलांना आनंदी ठेवतो, त्याला हे बक्षीस मिळते. तो चांगला मुसलमान आहे. सलमान खूप उदार आहे, सलमानचा उदारपणा आणि आईवडिलांची देवा, या दोन गोष्टी त्यांला सलमानचा फॅन बनवतात.

कोरोना काळात सलमान खान देवदूत बनून सध्या कोरोनाग्रस्तांना तसेच कोरोना योद्धांना मदत करत आहे. यामुळे देखील सलमान खानचे कौतुक केले जात आहे. त्याने अनेकांना मदत केली आहे. त्यांच्या संस्थेकडून अनेकांची जेवणाची सोय केली जात आहे. हे जेवण सुरक्षित आहे का याची खात्री करण्यासाठी तो स्वतः येतो.

दिवसेंदिवस त्याची मदत सुरूच आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच त्यांनी वाढत्या बलात्काराच्या घटनेवर देखील मत व्यक्त केले आहे, ते म्हणाले, मुलं आणि मुलींना एकत्र शिक्षण दिले जात असल्याने बलात्कार वाढत आहेत. आग आणि पेट्रोल एकत्र राहिले की बलात्कार तर होतच राहणार.

ताज्या बातम्या

अभिनेत्री गौहर खान उतरली पॅलेस्टाईनच्या समर्थनात, इस्त्रायलला धडा शिकवण्यासाठी केले ‘हे’ आवाहन

पावसामुळे रोड खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला, पाहा विडिओ

सोलापूरच्या भांगे कुटुंबियांचा नादच नाय! तीन गुंठ्यांत ७५ प्रकारची पिके, कमावतात हजारो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.