आता पाकिस्तान आणि चीनला फुटणार घाम, भारताला मिळणार ‘हे’ धोकादायक शस्त्र

नवी दिल्ली । भारताच्या सीमेला लागून असलेले देश म्हणजे पाकिस्तान आणि चीन. या दोन देशांची सीमेप्रकरणी सतत कुरकुर सुरू असते. चीनने भारतीय सीमेवर अनेक ठिकाणी आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. तसेच आपल्या हद्दीत ताबा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र आता भारताच्या वाटेला जाण्याची हिम्मत पाकिस्तान आणि चीन करणार नाही, कारण भारताने धोकादायक असे शस्त्र मिळवले आहे. याच्यापासून भारत शत्रूच्या देशात 400 किलोमीटर दूर वरून हल्ला करू शकतो.

यामुळे चीन आणि पाकिस्तानसाठी ही वाईट बातमी आहे. रशियाची अत्याधुनिक एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली लवकरच भारताच्या संरक्षण ताफ्यात दाखल होणार आहे. याची पहिली तुकडी यावर्षी ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये आपल्या देशात दाखल होईल.

यामुळे आता भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार आहे. हवेतील लांब पल्याचे शस्त्र नष्ट करण्याची ताकद या नव्या तंत्रात आहेत. हे नवीन तंत्रज्ञान जगाठी एक आश्चर्यकारक आहे. यामुळे आता जेव्हा ही प्रणाली भारताला मिळणार आहे, तेव्हा चीन आणि पाकिस्तानची झोप उडवणार आहे.

यासाठी भारताने २०१९ मध्ये ८०० कोटी डॉलर्सचा पहिला हप्ता भरला आहे. यासाठी भारतीय तज्ज्ञ रशियात पोहोचले आहेत. या नवीन कराराबाबत अमेरिकेने बंदी घालण्याची धमकी दिली होती. तरी देखील दिल्लीत हा करार करण्यात आला आहे.

भारताकडे नेहमीच स्वतंत्र परराष्ट्र धोरण होते, जे संरक्षण क्षेत्र धोरण आणि पुरवठा या बाबींनाही लागू होते. असे मोदी सरकारने सांगितले आहे. यामुळे आता अमेरिकेचा विरोध पत्कारून भारताने हा करार केला आहे.

भारताचा पाकिस्तान आणि चीनसोबत सतत सीमावाद सुरू आहे. भारतीय हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चीनने कब्जा केला आहे. यामुळे सतत तणावाची परिस्थिती निर्माण होत असते. हा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहे.

ताज्या बातम्या

रंजीत नाथ: कोरोनाच्या काळात रोज १५० भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणारा देवमाणूस

‘या’ बॉलरच्या बॉलिंगला घाबरत होते मोठमोठे बॅट्समन, आज त्याला दोन वेळचे जेवणही मिळणे झाले अवघड

पहिल्या डोसनंतर ‘या’ कोरोना लसीतून जास्त अँटीबॉडीज तयार होतात; ICMR च्या प्रमुखांचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.