‘आम्ही सगळं काही करतो तुम्ही फक्त परवानगी द्या’; भारताच्या मदतीला पाकिस्तान सरसावला

नवी दिल्ली | देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोरोना रुग्णांना बेड, ऑक्सिजन, लस यांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

देशातील परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कडक निर्बंधांची अंमलबजावणी करत आहे. कोरोना काळात देशातील अनेकांनी स्वत: पुढे येत देशावर आलेल्या संकटात मदत केली आहे. आता देशाचा दुश्मन असणारा पाकिस्तान कोरोना काळात भारताला मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.

पाकिस्तानमधील एधी फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  एक कोटी रुपयांची मदतीची घोषणा केली होती. भारतातील एका मुलीचा या संस्थेने सांभाळ केला होता. याच संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारतातील कोरोना परिस्थीती फार गंभीर आहे आणि आम्ही तुम्हाला ५० रुग्णवाहिका देण्याची इच्छा आहे. असं पत्र मोदींना लिहलं आहे.

एधी फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी फैजल एधी यांनी म्हटलं की, आम्ही भारतातील कोरोना परिस्थीतीवर लक्ष ठेऊन आहोत. कोरोना महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणामासंदर्भात आम्हाला चिंता आहे. या संकटाच्या काळात शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

आम्ही भारतासाठी ५० रुग्णवाहिका पाठवू इच्छितो. रुग्णवाहिकांसोबत सेवाही आम्ही तुम्हाला देऊ. माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. ही टीम स्वत: सर्व सामान घेऊन येणार आहे. आम्हाला भारताकडून काही नको फक्त परवानगी हवी. असं एधी म्हणाले आहेत.

पुढे म्हणाले, आमच्या टीममध्ये आरोग्य अधिकारी,  चालक, सपोर्टींग स्टाफ, चालक, इतर अधिकारी असतील. आम्ही इंधन, जेवन आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू.  तुम्ही आम्हाला फक्त भारतात येण्याची परवानगी द्या.

तुम्ही सांगाल त्या प्रदेशांमध्ये आम्ही आमच्या टीम पाठवण्यास तयार आहोत. आमच्या मदतीने भारतीय नागरीकांना दिलासा मिळणार असेल तर तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. असं एधी संस्थेचे ट्रस्टी फैजल एधी म्हणाले आहेत.

भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी भारताचे वैर आहे. पाकिस्तान सीमेवर नेहमी शस्त्रसंधीच उल्लंघन करत असतो. यामुळे भारताने आजवर अनेक सैनिकांना गमावले आहे. आता पाकिस्तानमधीलच एका संस्थेने भारतासाठी मदतीचा हात पुढे केल्याने यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान देशात कोरोनाने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राच्या मदतीला धावला ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री; राज्याला दिले ३०० व्हेंटीलेटर्स
वुमन पावर! शिक्षण फक्त चौथी पास, वय ५२ वर्षे, वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटी
आता लवकरात लवकरे बरे होणार कोरोना रुग्ण; Zydus cadila च्या ‘त्या’ औषधाला मंजूरी
अख्ख घरच कोरोनाने गिळलं! पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यासह घरातील चौघांचा मृत्यू

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.