दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या प्रकरणात पाकिस्तानचा काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक दोषी आढळला आहे. यासिन मलिक दोषी आढळल्यानंतर पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांचे सरकार चांगलेच संतापले आहे. एनआयए कोर्टाने बेकायदेशीर गोष्टी केल्याच्या प्रकरणात यासीन मलिकवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. (pakistan angry on india because yasin malik punishment)
या संपूर्ण घटनेमुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना बोलावून राजनैतिक आक्षेप घेतला आहे. आज न्यायालय काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला शिक्षा सुनावणार आहे. पाकिस्तानने काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकची बाजू घेत भारताविरोधात अनेक विधाने केली आहेत.
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकवरील आरोप बनावट असल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. यामुळे पाकिस्तान सरकारचा तिळपापड झाला आहे. भारत काश्मिरी नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे.
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकची प्रकृती तुरुंगात खराब असून त्याच्यावर योग्य उपचार होत नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. यावेळी पाकिस्तान सरकारने काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला राजकीय कैदी’ म्हणत त्याच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासिन मलिकवरील आरोप मागे घेण्याची मागणी भारताकडे केली आहे.
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनेकडे भारताविरोधात तक्रार केली आहे. भारताने यासिन मलिकशी योग्य वागणूक दिली नाही, याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेने भारताविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तान सरकारने केली आहे. यासीन मलिकला २०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील NIA न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यात दोषी ठरवण्यात आले आहे. यासिन मलिकने स्वातंत्र्य संग्रामाच्या नावाखाली जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी जगभरातून निधी गोळा केला होता. यासाठी एक विशेष यंत्रणा देखील यासिन मलिकने तयार केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
टीम डेव्हिडने नटराजनला दाखवून दिली त्याची लायकी, एका ओव्हरमध्ये ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी मिळणार? राजकीय घडामोडींना वेग
सोनू म्हणाला, सर तुमच्या हाताखाली काम नाही करायचं, तेज प्रतापची झाली बोलती बंद, पहा व्हिडीओ