मिल्खा सिंगकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या अब्दुल खलीक यांनी काय केले, जाणून घ्या..

नुकतेच भारताचा धावपटू मिल्खा सिंगचे निधन झाले. यामुळे सर्व देशाने दुःख व्यक्त केले. यानंतर मात्र पाकिस्तानचा धावपटू अब्दुल खलीक चर्चेत आले आहेत. पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची स्पर्धा सुरू होती. मिल्खा सिंग आणि अब्दुल खलीक यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अब्दुल हा पाकिस्तानचा महान धावपटू होता. अनेक विक्रम त्यांच्या नावावर होते. त्या दिवशी धावण्याच्या स्पर्धेत मिल्खा सिंगने आशियाच्या सर्वांत जलद धावपटू अब्दुल खलीक यांना मागे टाकले. आणि विजय मिळवला होता.

त्या दिवशी मिल्खा धावलाच नाही तो उडत होता, असेही म्हटले जाते. यामुळे जनरल अयुब खान यांनी मिल्खाला ‘द फ्लाईंग सिख’ असे नाव दिले. अब्दुल खलीक यांचे १९८८ मध्ये रावळपिंडी इथे निधन झाले.  मिल्खा सिंग आणि अब्दुल खलीक दोघेही गरीब होते.

दोघेही लष्करात भरती झाले. दोघेही पंजाबमध्ये जन्मले होते. दोघांनीही पंजाबचा गौरव वाढवला. युध्दात दोघेही आपआपल्या देशांकडून एकमेकांविरुध्द लढले. जनरल अयुब खान यांनी मिल्खाला फ्लाईंग सिख ही पदवी दिली.

तर १९५४ मध्ये मनिला इथे भरलेल्या आशियाई स्पर्धेत अब्दुल खलीक यांनी १०.६ सेकंदात धावण्याची स्पर्धा जिंकून विक्रम रचला होता. तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी खलीक यांना ‘द फ्लाईंग बर्ड ऑफ एशिया’ ही पदवी खलीक यांना बहाल केली.

मिल्खा सिंग यांच्याकडून पराभव झाल्यानंतर खलीक यांना पाकिस्तान विसरला. अब्दुल यांचा लहान भाऊ, अब्दुल मलिक यांना त्याची प्रचंड खंत वाटते. ते म्हणतात मिल्खा सिंग यांचा मी खूप आदर करतो. एक माणूस म्हणून मिल्खा मोठा होता; मात्र जेव्हा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट बघतो, तेव्हा मनाला वेदना होतात.

भारताने मिल्खा सिंगसारख्या खेळाडूला डोक्यावर घेतले, खूप आदर दिला, मात्र जगभरात पाकिस्तानचे नाव करणाऱ्या खलीकसारखा खेळाडू सरकारकडून उपेक्षित राहिला. मिल्खाच्या जीवनावर चित्रपट निघाला. मिल्खा अजरामर झाला, मात्र आयुष्यभर देशासाठी धावणाऱ्या खलीक यांचे धावणे वाया गेले असे ते म्हणाले.

ते मेलबर्न ऑलिंपिक, रोम ऑलिंपिकमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत ठेवणारे एकमेव पाकिस्तानी धावपटू होते. राष्ट्रीय खेळ स्पर्धेत १०० सुवर्णपदके, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २६ सुवर्णपदके, २३ रजतपदके त्याने मिळविली. यामुळे त्यांनी देशाचे मोठे नाव मोठे केले होते.

१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात अब्दुल खलीक यांना युद्धकैदी म्हणून अटक झाली. त्यांना मेरठच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी मिल्खा सिंग, अब्दुल खलीक यांना भेटायला गेले. खलीक यांची काळजी घ्या अशा सूचना मिल्खा सिंग यांनी कारागृह निरीक्षकांना दिल्या. त्यांच्या मुलांनी याबाबत माहिती दिली.

तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांनी खलीक यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला, मात्र इतर युद्धकैद्यांसोबतच माझी सुटका करावी, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेदरम्यान मिल्खा आणि खलीक यांची एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. त्या वेळी मिल्खासारख्या किती धावपटूंचा पराभव मी केला, असे ते म्हणाले होते.

आपल्या दोघांमध्ये स्पर्धाच नाही असा टोमणाही खलीक यांनी मिल्खा सिंग यांना लगावला, मात्र दुसऱ्याच दिवशी मिल्खा सिंग यांनी ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. मात्र पाकिस्तान देशाने आपल्या खेळाडुचा सन्मान केला नसल्याचे त्यांची मुलं सांगतात.

ताज्या बातम्या

काय सांगता! एलियनने केलं चक्क तरुणीचं अपहरण, त्यानंतर जे झालं ते तुम्हीच वाचा

विकृतीचा कळस! भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडले आणि त्याच्यावर उभे राहून…, पहा भयानक व्हिडिओ

बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.