VIDEO: धक्कादायक! बाप मदतीसाठी ओरडत राहिला, लोकांनी केले १३ वर्षीय मुलीचे अपहरण आणि….

देशातच नाही, तर जगभरात धर्मांतरावरुन अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना पाकीस्तानमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ पण समोर आला आहे.

पाकीस्तानचे एक्टिविस्ट सदई संगरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. मंगळवारी एका १३ वर्षाच्या मुलीचे जबरदस्ती धर्मांतरण करण्यात आले. त्या मुलीला जबरदस्ती इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी सांगण्यात आला आहे.

इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी काही लोकांनी त्या मुलीवर जबरदस्ती केली. त्यावेळी तिचे वडिल ओरडून लोकांना मदतीसाठी आवाज देत होते, पण कोणीही पुढे आले नाही, असा दावा सईद संगरी यांनी केला आहे.

तसेच हा व्हिडिओ फेक असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे. पण यावर सईद संगरी म्हणाले, हा व्हिडिओ खोटा नसून खरा आहे. ही घटना खरंच घडली आहे. पण अजून तिथल्या स्थानिक नागरीकांनी कुठल्याही या घटनेबद्दल साक्ष दिलेली नाही.

ही घटना सिंध प्रातांत झाली आहे. गेल्यावर्षीही इथे १०२ हिंदू लोकांना जबरदस्ती मुस्लिम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. या लोकांमध्ये पुरुषांसोबत महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच तिथे काही मंदीरातील देवी-देवतांच्या मुर्त्या तोडण्यात आल्या होत्या आणि तिथे मस्जिद बांधण्यात आली होती.

गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या सिंध प्रांतामध्ये हिंदू आणि भील जातीतल अनेक लोकांची घरे तोडण्यात आली होती. तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओ पण व्हायरल झाला होता. भारताने नुकताच पाकीस्तानमध्ये सुरु असलेल्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये मांडला आहे.

जबरदस्ती धर्मांतरण करणे ही गोष्ट पाकीस्तानात सामान्य होत चालली आहे. या ठिकाणी अनेक नाबालिक मुलींचे अपहरण केले जाते आणि त्यांचे धर्मपरीवर्तन केले जाते. त्यांच्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर त्यांचे धर्मपरीवर्तन करुन लग्न लावून दिले जाते, असे भारताने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी व्यक्त केली त्यांची शेवटची इच्छा, वाचून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी
थरारक! रस्त्यावर सायकलवरुन पडला तरूण, उठण्याचा प्रयत्न करताच मागून कार आली अन्… पहा व्हिडिओ
करोडोंच्या संपत्तीचा मालक असला तरी वडील सलीन खानचे एक स्वप्न अजूनही पुर्ण शकला नाही सलमान खान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.