वरमाला घालताना फाटला पायजामा आणि…! आदित्यच्या लग्नात घडला हा प्रकार

मुंबई । लग्न म्हटले की अनेक किस्से लग्नात घडत असतात. कधी काही कारणांवरून भांडणे होतात. तर कधी नवरदेवाबद्दल काहीना काही घडत असते. असाच एक किस्सा गायक आदित्य नारायणसोबत घडला आहे. ऐनलग्नात त्याचा पायजमा फाटला आणि त्याची चांगलीच फजिती झाली.

काही दिवसांपूर्वीच आदित्य आणि श्वेता अग्रवाल यांचे लग्न मोठ्या थाटात झाले. या लग्नसमारंभातील फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरच व्हायरल होत आहेत. यामध्येच आदित्यसोबत घडलेला किस्सादेखील चर्चेत येत आहे. आदित्यने हा किस्सा सांगितला आहे.

अदित्य म्हणाला, लग्नात ज्यावेळी श्वेताला वरमाला घालायची होती, त्यावेळी माझ्या भावांनी मला वर उचलले. त्यानंतर माझ्या मित्रांनीदेखील मला उचलले. पण त्याचवेळी माझा पायजमा फाटला. खरं तर तो क्षण अत्यंत लाजिरवाणा होता. पण, हा क्षण कायम माझ्या लक्षात राहिलं.

यामुळे त्याची तारांबळ उडाली होती. आदित्य नारायण हा लोकप्रिय सूत्रसंचालक असून तो एक गायकदेखील आहे. गायक उदित नारायण यांचा तो एकुलता एक मुलगा आहे. तर श्वेता ही अभिनेत्री आहे. तिने शापित या चित्रपटातून २०१० मध्ये कलाविश्वात पदार्पण केले.

त्यांनी जवळपास १० वर्ष एकमेकांनी डेट केल्यानंतर या दोघांनी जुहूमधील इस्कॉन टेम्पल येथे लग्नगाठ बांधली. मात्र लग्नात आदित्यसोबत घडलेला प्रकार हा त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील,असेही तो म्हणाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.