वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही 11 महीन्यांच्या वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी

पिंपरी चिंचवड। स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असलेल्या पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. रविवारी सायंकाळाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वेदिकावर उपचार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगद्वारे 16 कोटी रुपये जमा केले होते. वेदिका लवकर बरी व्हावी यासाठी देश विदेशातील अनेक दाम्पत्यांनी वेदिकाला मदत केली होती. त्यानंतर अथक प्रयत्नांना यश मिळाले व शेवटी अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं.

15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. नंतर तिचं शरीर लसीला साथ देऊ लागलं, सकारात्मक हालचाली दिसू लागल्या. सगळं सुरळीत होताना दिसू लागलं, पण गेल्या काही दिवसांत तिची तब्येत पुन्हा खालाऊ लागली. मात्र रविवारी सांयकाळी अचानक त्रास जाणवू लागला व शेवटी उपचारादरम्यान वेदिकाने प्राण सोडला.

वेदिकाचे वडील सौरभ शिंदेंनी फेसबुकवर स्टेटस ठेवत ही धक्कादायक बातमी सगळ्यांना कळवली. फेसबुकवर तिच्या नावाने असलेल्या पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करत वेदिका नसल्याची माहिती देण्यात आली. मात्र वेदिकाच्या जाण्यानं संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.

वेदिका या आजारातून मुक्त व्हावी यासाठी आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला व तिला लस 16 कोटी रुपयेची लस मिळवून देण्यात यशस्वी ठरले. मात्र रविवारी ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.

वेदिकावर उपचार करण्यासाठी पैशांच्या रुपात मदत करणाऱ्यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्वांचेआभार मानले होते. त्यांनी 16 जून रोजी “16 कोटींचे इंजेक्शन वेदिका हिला दिल्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिच्या आई वडिलांसह आम्हा सर्वांच्या कष्टाचं आज चीज झालं याचं खरं तर मनाला समाधान वाटलं असं अमोल कोल्हे म्हणाले होते. मात्र आता वेदिकाच्या जाण्यानं तिच्या कुटुंबा सोबतच सर्वांना धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक! पोहण्यात पटाईत असूनही महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर धबधब्यात गेला वाहून, शोधकार्य सुरू
काय सांगता! अभिनेत्री जान्हवी कपूर करणार लवकरच लग्न; असा असेल मुलगा
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही
बलात्कार करणाऱ्या आरोपीशीच लग्न करायला निघाली तरुणी; आरोपीला मिळाली होती २० वर्षांची शिक्षा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.