Share

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला! ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी, पर्यटकांना मारणारे २ दहशतवादी ठार!

Pahalgam attack: २२ एप्रिलचा तो काळा दिवस अजूनही लोकांच्या जिव्हारी लागलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पाहलगाम (Pahalgam) परिसरात बाईसरान व्हॅलीमध्ये जेव्हा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, तेव्हा अनेकांच्या घरातील दिवा कायमचा विझला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा निष्पाप पर्यटकांचाही जीव गेला. कोणी सहलीला गेलेलं पण परत आले ते मृत्यूच्या बातमीनेच.

आता या घटनेला तीन महिने उलटत असतानाच भारतीय लष्कराने (Indian Army) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ऑपरेशन महादेव’ (Operation Mahadev) अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) लिडवास (Lidwas) भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हीच ती मंडळी होती ज्यांनी पाहलगाम हल्ल्यात सहभाग घेतला होता.

ऑपरेशन महादेवचं मोठं यश

सोमवारी (२८ जुलै) हरवन (Harwan) परिसरातील मुलनार (Mulnar) भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तासभर चकमक झाली. त्यात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. यामध्ये पाकिस्तानातून आलेला सुलेमान शाह (Suleman Shah) आणि यासिर (Yasir) यांचा समावेश होता. दोघंही पाहलगाम हल्ल्याचे मुख्य सूत्रधार होते. घटनास्थळावरून एक अमेरिकन बनावटीचं कार्बाइन, एक एके-४७ रायफल, १७ ग्रेनेड आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं.

कोण होते हे दहशतवादी?

पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानचे (Pakistan) सुलेमान शाह (Suleman Shah), अबू तल्हा (Abu Talha), आसिफ फौजी (Asif Fauji) हे तीन होते. त्यांच्यासोबत स्थानिक आदिल गुरी (Adil Guri) आणि अहसान (Ahsan) यांचा सहभाग होता. सुलेमान आणि यासिरला ठार मारण्यात आलं असून अली (Ali) याचाही मृतदेह सापडला आहे. एका चौथ्या दहशतवाद्याचंही या भागात अस्तित्व असल्याचा संशय आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा

दहशतवाद्यांच्या कृत्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) राबवलं होतं. या मोहीमेदरम्यान पीओके (PoK) आणि पाकिस्तानात हल्ले करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या मोहिमेवरून तीव्र चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी लोकसभेत सांगितलं की, “देशाच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार, लष्कर आणि संपूर्ण प्रशासन वचनबद्ध आहे.”

२२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील पुणे (Pune), डोंबिवली (Dombivli), पनवेल (Panvel) आणि नागपूर (Nagpur) येथील सहा पर्यटक ठार झाले. त्यात डोंबिवलीचे हेमंत जोशी (Hemant Joshi), संजय लेले (Sanjay Lele), अतुल मोने (Atul Mone), पनवेलचे दिलीप देसले (Dilip Desale) यांचा समावेश होता. या घरांमध्ये अजूनही या घटनेच्या आठवणीने हुंदका दाटतोय.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now