एवढ्या वर्षांनी पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; म्हणाली, सेटवर कोणी नसताना ऋषी कपूरने मला…

कपूर कुटूंब बॉलीवूडधील सर्वात जुने कुटूंब आहे. कपूर कुटूंबातील अनेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. राज कपूर, शम्मी कपूर, ऋषी कपूरसोबतच त्यांची मुलं देखील इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला कपूर घराण्यातील करिना कपूर आणि रणबीर कपूर अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.

करिना आणि रणबीर मोठे स्टार्स आहेत. त्यांच्यासोबत काम करायला सर्वांनाच खुप आवडते. रणबीरसोबत काम करण्यासाठी अभिनेत्री नेहमीच तयार असतात. कारण त्याचा स्वभाव खुपच चांगला आहे. रणबीर प्रमाणेच त्याचे वडील ऋषी कपूरसोबत काम करायला देखील अभिनेत्री नेहमी तयार असायच्या.

ऋषी कपूरने त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि चित्रपट नेहमीच आपल्यासोबत असतील. त्यांच्यासोबत काम करणारे कलाकार त्यांची आठवण काढत असतात. अशाच एक कलाकार म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. त्यांनी ऋषी कपूरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

पद्मिनी कोल्हापूरेने एका मुलाखतीमध्ये ऋषी कपूरसोबत काम करण्याचा अनूभव शेअर केला होता. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. प्रेमरोग सारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये दोघांनी काम केले. त्याकाळी दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी देखील खुप पसंत केले होते.

पद्मिनीने ऋषी कपूरबद्दल बोलताना सांगितले की, दोघांनी अनेक वेळा एकत्र काम केले होते. म्हणून खुप आठवणी आहेत. त्यांचा स्वभाव फटकळ होता. पण तेवढाच प्रेमळ देखील होता. ऋषी कपूर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांची खुप काळजी घ्यायचे.

त्या पुढे म्हणाल्या की, ऋषी कपूरने माझी नेहमी मदत केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी दोन वेळा माझा जीव वाचवला होता. चित्रपटाच्या शुटींग वेळी सेटवर आग लागली होती. त्यावेळी सेटवर जास्त लोकं नव्हते. अशा परिस्थितीमध्ये ऋषी कपूरने माझे प्राण वाचवले होते.

पद्मिनी आणि ऋषी कपूरने होगा तुमसे प्यारा कौन, प्रेमरोग, जमाने को दिखाना है, हवालात, प्यार के काबिल, राहि बदल गए अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण तुमसे प्यारा कौन आणि प्रेमरोग हे दोन चित्रपट सुपरहिट झाले होते. या चित्रपटामूळेच त्यांच्या करिअरला नवे वळण मिळाले होत.

दोन्ही चित्रपट खुप प्रसिद्ध झाले होते. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांच्या सेटवर आग लागली होती. त्यावेळी ऋषी कपूरने पद्मिनीचा जीव वाचवला होता. ही आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. ऋषी कपूरच्या आठवणींमध्ये पद्मिनी कोल्हापूरे भावूक झाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शालूचा जिलेबी बाई गाण्यावरील डान्स पाहून झाले घायाळ; पहा व्हिडीओ

अभिनय क्षेत्रात अयशस्वी असूनही राजीव कपूर होते करोडोंच्या संपत्तीचे मालक, जाणून घ्या एकूण आकडा

४२ वर्षांची असूनही अविवाहीत आहे शिल्पा शेट्टीची बहीण शमिता; ‘ह्या’ एका चुकीमूळे करिअर झाले होते खराब

अमृता सिंगसोबत झालेल्या घटस्फोटाची आठवण काढून रडला सैफ; म्हणाला, माझ्यासाठी सर्वात कठिण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.