एकाच वेळी ५०० लोकांचा गेला असता जीव; पण अखेरच्या क्षणात घडला ‘तो’ चमत्कार

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. तसेच रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण झाला आहे.

दिल्लीत पण कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीतील रुग्णालयातही ऑक्सिजनचा पुरवठा संपत चालला आहे. असे असतानाच दिल्लीमध्ये एक भितीदायक घटना घडली आहे.

दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपत चालला होता. रुग्णालयांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची विनंती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केली होती.

जीटीबी रुग्णालयात ५०० रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहे. केवळ ४ तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक आहे, असे ट्विट सत्येंद्र जैन यांनी केले होते. त्यामुळे जर वेळेत ऑक्सिजन पोहचले नसते, पण ५०० रुग्णांच्या जीवाला धोका होता.

जैन यांचे ट्विट पाहल्यानंतर काही वेळातच उत्तर प्रदेशच्या मोदीनगरमधून १४ टनांचा ऑक्सिजन टँकर निघाला आणि जीटीबी रुग्णालयाजवळ पोहचला. त्यावेळी उत्तर प्रदेशचे दोन पोलिस कर्मचारीही आले होते.

जर ऑक्सिजनचा टँकर पोहचण्यास उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. अशात आता टँकर उपलब्ध झाला असतानाही रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, अशी तक्रार काही रुग्णांनी केली होती.

दरम्यान, दिल्लीच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये डिस्प्ले बोर्डवर ऑक्सिजन आणि आयसीयु बेड्सचा तपशील देण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात स्थिती जरा वेगळीच असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कॉमेडीयन सुनील ग्रोवरची पत्नी दिसते अभिनेत्रीपेक्षाही सुंदर; पहा फोटो
मंदिर निर्माण होतंय, पण हॉस्पिटलमध्ये बेड मागू नका; स्वरा भास्करची मोदींवर जोरदार टीका
पुण्यातील ‘या’ मोठ्या कंपनीने चीनला कंपनी विकून १४१९ कामगारांना केले कमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.