मुंबईचा ऑक्सिजन मॅन! २२ लाखांची गाडी विकून आलेल्या पैशातून गरीबांना मोफत ऑक्सिजन वाटप

मुंबई । देशावर सध्या कोरोनाचे मोठे संकट आले आहे.  वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.

असे असताना मुंबईतील ऑक्सिजन मॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहानवाज शेख हा गेल्या वर्षीपासून मुंबईत कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजन मिळवून देत आहे.

त्याचे काम अनेकांसाठी प्रेरणा देणारे ठरत आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. मलाडमधील ३१ वर्षीय शहानवाज शेखने मागीलवर्षी स्वत:ची फोर्ड एण्डीव्हर ही महागडी एसयुव्ही गाडी विकून त्यामधून कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली.

शहानवाजने २५० हून अधिक कुटुंबांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवून मदत केली. त्याने स्वत:ला या कामामध्ये झोकून दिले आहे. शहानवाज आपल्या गाडीचा वापर रुग्णांना सोडवण्यासाठी करायचा.

मात्र त्याच्या व्यवसायिक सहकाऱ्याच्या बहिणीचे कोरोनामुळे निधन झाले. ही महिला सहा महिन्याची गरोदर होती. या महिलेला वेळीच ऑक्सिजन मिळाला असता तर तिचे प्राण वाचले असते, असे शहानवाजला कळाले.

तेव्हा त्याने स्वत:ची गाडी विकून अशापद्धतीने ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने कोणाचाही मृत्यू होऊ नये, म्हणून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यास सुरुवात केली. ५ जूनपासून शहाजनवाजने अशा पद्धतीने २५० कुटुंबांना मदत केली आहे.

सहकाऱ्यांच्या बहिणीचे कोरोनाने निधन झाले म्हणून त्याने ऑक्सिजन पुरवायचा निर्णय घेतला. डॉक्टरांचे शिफारस पत्र आणि सिलेंडर स्वता घेऊन जाणे या दोनच अटी त्यांच्या आहेत, जर सर्व कुटुंब बाधित असेल तर ते स्वता कोरोनाची काळजी घेऊन ऑक्सिजन पोहोच करतात.

ताज्या बातम्या

भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले ‘अदर पुनावाला डाकू, त्यांची कंपनी ताब्यात घ्या’

एकेकाळी फुगे विकायचा MRF कंपनीचा मालक, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी टायर बनवणारी कंपनी

सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या पत्नीच्या फोटो; दिसते खुपच सुंदर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.