ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर काय करावे, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयांनी दिलीय महत्वाची माहिती

दिल्ली । देशात सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. असे असताना आरोग्याच्या सोयी खूपच कमी पडत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन देखील उपलब्ध नाहीत. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. रुग्णांसाठी देशात सर्वत्र ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे.

आता आरोग्य मंत्रालयाने काही उपाय सुचवले आहेत. या माध्यमाने घरीच शरीरातील ऑक्सीजनचा योग्य केला जाऊ शकतो. यामध्ये आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की Proning (पेटावर झोपणे) याच्या माध्यमाने शरीरातील ऑक्सीजन स्तर वाढविला जाऊ शकतो.

आता मेडिकली Proning ला शरीरात ऑक्सीजनचा स्तर वाढविण्याच्या क्रियेच्या रुपात मान्यता आहे आणि हे होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

रुग्णांच्या शरीरातील ऑक्सीजनचा स्तर ९४ पेक्षा कमी झाला असेल, तेव्हा Proning ची आवश्यकता भासते. एवढेच नाही. Proning साठी रुग्णाला पोटावर झोपायचे आहे आणि एक उशी तोंड अथवा मानेखाली आणि एक अथवा दोन उशा छाती आणि पोटाखाली तसेच २ उशा पायाखाली ठेवायच्या.

यासाठी ४-५ उशांची गरज पडेल आणि या क्रियेदरम्यान रुग्णाला सातत्याने श्वास घेत रहायचे आहे. तसेच Proning क्रिया ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ करायची नाही, जेवणानंतर एक तास ही क्रिया करू नये.

तसेच गर्भधारणा किंवा हृदयविकाराचा त्रास असल्यास ही क्रिया करू नये, यामुळे आपली ऑक्सिजन लेव्हल वाढेल आणि रुग्णाला आराम भेटेल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ताज्या बातम्या

काम न करता पठ्ठ्या घेत होत १५ वर्षे बसून पगार; पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर

विनोद खन्नासोबत रोमँटिक सीन द्यायला घाबरायच्या अभिनेत्री; कारण ऐकून धक्का बसेल

“महाराष्ट्रात कोविड मृत्यु तांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.