ह्रदयद्रावक… ऑक्सिजन बेडवर ‘Love U जिंदगी’ गाणं ऐकत थिरकणाऱ्या ब्रेव्ह गर्लचा मृत्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मोठा धुमाकूळ घातला आहे. देशात दररोज लाखोंनी मृतदेह सापडत असून हजारोंनी लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयामध्ये पण बरेचसे रुग्ण कोरोनावर उपचार घेताना दिसून येत आहेत.

अशा नकारात्मक वातावरणात एखादा सकारात्मक व्हिडीओ पहिला की कोरोना रुग्णांना पण आधार मिळत आहे. मागे एक असाच सकारात्मकता दाखवणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये एक ३० वर्षांची तरुणी लव्ह यु जिंदगी या गाण्यावर डान्स करताना दिसून आली होती. विशेष बाब म्हणजे तिला कोरोना झालेला होता आणि तिच्या नाकाला ऑक्सिजन मास्क पण लावलेला होता.

त्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अनेकांनी त्या मुलीच्या साकारात्मकतेला दाद पण दिली होती. पण या तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात तिने शेवटचा श्वास घेतला.

आयुष्यावर प्रेम करायला शिकवणाऱ्या तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाऊ राहिली आहे. मागच्या आठवड्यात ट्विटरवरून या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

डॉ. मोनिका लंगेह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या मुलीचा व्हिडीओ टाकला होता. त्यांच्या मतानुसार या तरुणीला आयसीयूत जागा न मिळाल्यामुळे कोविड इमर्जन्सी विभागात ठेवण्यात आले होते. तिच्यावर प्लाझ्मा थेरपी आणि रेमडेसिवीर इंजेक्शचे पण उपचार चालू होते.

ताज्या बातम्या
आधी सगळी संपत्ती नावावर करा तरच मी किडणी देईल; कोरोनाग्रस्ताच्या पत्नीचा दवाखान्यातच रूद्रावतार

मल्टीटास्कींग, इंग्रजीवर प्रभुत्व, अभ्यासू आणि संयमी वृत्ती, वाचा शरद पवारांच्या लेकीबद्दल..

सर्व केंद्राने करायचे मग राज्याने माशा मारायच्या का?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.