उत्तर प्रदेशमध्ये जनावरांसाठी ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची चोख व्यवस्था, योगींचे आदेश

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांना बेड देखील उपलब्ध होत नाहीत. आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

असे असताना उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने राज्यातील कोरोना काळात गायींच्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष देण्याचे ठरवले आहे. यासाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आता चर्चा होऊ लागली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोशाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत गोशाळेत गायी आणि अन्य जनावरांसाठी सर्व आरोग्य सुविधा, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यांची चोख व्यवस्था करण्याच्या सूचना योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त गोशाळा केंद्रे आहेत. ज्यामध्ये राज्यात तब्बल ५,७३,४१७ गायी आहेत. फिरणाऱ्या गायी, भटक्या जनावरांना वाचवण्यासाठी सरकार अधिक गोशाळा आणि आश्रमांची व्यवस्था करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने भटक्या जनावरांची काळजी घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ९०० रुपये आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे. यामुळे आता मोठा खर्च केला जामार आहे.

यानुसार आता गायीची काळजी घेतली जाणार आहे. हेद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वीच सिहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे प्राण्यांना देखील कोरोना होतोय हे सिद्ध झाले आहे.

ताज्या बातम्या

वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने केली शस्त्रक्रिया; गमवावा लागला जीव

पंतप्रधान मोदी फक्त मन की बात करतात, काम की बात नाही; मुख्यमंत्र्यांचा जबरदस्त टोला

कृष्णप्रकाश यांच्या वेशांतर करून मध्यरात्री पोलीस ठाण्यांना अचानक भेटी, बेजबाबदार पोलिसांना फुटला घाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.