ऑक्सफर्डची कोरोना लस किती प्रभावी? अखेर WHO ने सोडले मौन; म्हणाले..

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. अशातच सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. परंतु, ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीबाबत काही शंका उपस्थित करण्यात येत आहेत. आता याबाबत खुद्द WHO कडून माहिती सांगण्यात आली आहे.

याबाबत बोलताना डब्ल्यूएचओमध्ये इम्युनायझेशन, व्हॅक्सिन आणि बायलॉजिकल्स डायरेक्टर केट ओ ब्रायन यांनीसुद्धा याबाबत सहमती व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना केट म्हणतात की, प्रेस रिलीजमध्ये केवळ मर्यादित माहिती दिली जाऊ शकते. लस कशाप्रकारे इम्युन रिस्पॉन्स करते याबाबत जास्त माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

या सोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीसुद्धा या लसीची सुरक्षा आणि प्रभावाचे आकलन करण्यासाठी अधिकाधिक आकडेवारी गोळा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

 सिरम इन्स्टिट्यूटने केला १०० कोटींचा मानहानीचा दावा…
हैदराबाद येथील एका रुग्णाने ‘कोविशील्ड’ लस घेतल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यापोटी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई त्याने मागितली आहे. मात्र सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

याबाबत सीरमकडून सांगण्यात आले की, रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून असे चुकीचे आणि गंभीर आरोप करणाऱ्या या व्यक्तीवर कंपनीकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
भाजपचे माजी मंत्री लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावले; ऑडिओ क्लिप व्हायरल
”अब्दूल सत्तार तुझ्यासारखे लोकं आमची गाडी धुवायला असतात, औकातीत रहा”
विद्या बालनने भाजप मंत्र्याच्या ‘त्या’ ऑफरला नकार दिल्याने दादागारी करत शुटींग पाडले बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.