मुलीच्या हातावरचे टॅटू पाहून घरमालक घाबरला आणि तिला घरातून काढले बाहेर, वाचा संपुर्ण प्रकरण

टॅटू हे आजकाल फॅशनसारखे झाले आहे, लोकांनाही ते आवडते. पण कॅनडातील टोरंटो येथून एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका विद्यार्थिनीने टॅटू काढले. त्या टॅटूमुळे तिचा घरमालक तिच्यावर इतका चिडला की त्याने तिला त्याच्या घरातून हाकलून लावले.

मुलीने त्या घरमालकाचे सर्व पैसे दिल्यानंतर आणि ती तिथे चांगली राहत असताना घरमालकाने असे केले. पण अचानक घरमालकाने हा निर्णय का घेतला याचे कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वास्तविक, ही घटना टोरांटोची आहे. ‘द सन’ मधील एका अहवालानुसार ही मुलगी मेडिकलचे शिक्षण घेते.

मुलीने अलीकडेच ओंटारियोच्या एका विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे. या मुलीने तिच्या विद्यापीठाच्या शेजारी स्वत: साठी राहण्यासाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. ऑनलाईन शोधादरम्यान तिला एक ठिकाण आवडले आणि तिने तिथे भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला.

मुलीने या घराच्या मालकाला भेटून जागा फायनल केली आणि घरमालकाने तिला मागितलेली संपूर्ण रक्कम दिली. एवढेच नाही तर भाड्याचा करारही करण्यात आला आणि मुलगी सेटल होण्यासाठी तिथे पोहोचली जेणेकरून ती लवकरात लवकर आपला अभ्यास सुरू करू शकेल.

दरम्यान, असे काही घडले की तिच्या मालकाने मुलीला तेथे राहण्यास नकार दिला. मालकाने जे कारण सांगितले ते ऐकून तिला धक्काच बसला. तिला वाटले आतापर्यंत सर्व काही ठीक आहे मग अचानक असे काय घडले? तिने वारंवार घरमालकाला त्याचे कारण विचारले पण घरमालकाने एवढेच सांगितले की त्याला त्याची खोली द्यायची नाही.

तिच्या हातावरच्या विचित्र टॅटूमुळे तिला मालकाने खोली देण्यास नकार दिला हे कळल्यावर तिला धक्का बसला.घरमालक कोणत्याही प्रकारे ऐकायला तयार नव्हता. अखेरीस मुलीला घर रिकामे करावे लागले. अहवालानुसार, या मुलीने तिच्या पुर्ण शरीरावर सर्व टॅटू बनवले आहेत.

घरमालकाने सांगितले की मुलीचे हात टॅटूने भरलेले आहेत आणि हे टॅटू पाहून त्याला भीती वाटते. म्हणूनच त्याला या मुलीला ठेवायचे नव्हते. आता कारण विचित्र होते पण घर त्याचे आहे त्यामुळे कोणी काहीही करू शकत नव्हते. पण या प्रकरणानंतर सगळ्यांना धक्का बसला होता की घरमालक असं कसं करू शकतो.

महत्वाच्या बातम्या
अर्शद वारसीचा ट्रांसफॉर्मेशन लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का; केली जातीये थेट जॉन सीनाशी तुलना…
पळून जाणाऱ्या जोडप्याला कुटुंबियांनी पकडलं, गळ्यात टायर घालून भरचौकात नाचवलं; पहा व्हिडिओ
महिला अत्याचारांचे सर्वात जास्त प्रकरण भाजपशासित राज्यांमध्येच; काँग्रेसने आकडेवारी सादर करत भाजपचे केले तोंड बंद
सलमान खानच्या ‘शेरा’ला तर सगळेच ओळखतात पण या व्हिडीओनंतर फेमस झाला राज कुंद्राचा बॉडीगार्ड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.