Share

Yogi Sarkar: त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी अन् आमच्या घरांवर बुलडोझर, योगी सरकारवर ओवैसी संतापले

Asaduddin - Owaisi

योगी सरकार(Yogi Sarkar): एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हेलिकॉप्टरने कावडी यात्रींवर पुष्पवृष्टी केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, तुम्ही कावडी यात्रींवर फुलांचा वर्षाव करा पण मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवू नका.(Yogi Sarkar, Asaduddin Owaisi, UP, Kavadi Yatri, Yogi Adityanath)

ओवेसी म्हणाले की, यूपीमध्ये एका समाजाबद्दल इतके प्रेम का आहे आणि इतरांबद्दल समान दृष्टीकोन का नाही. सबका साथ सबका विकास याविषयी वेळोवेळी बोलले जाते पण यूपीमध्ये मुस्लिमांना कशी वागणूक दिली जाते. एका खासगी वाहिनीशी बोलताना ओवेसी म्हणाले की, तुम्ही यूपीमध्ये पाहत आहात, एकीकडे हेलिकॉप्टरमधून यात्रींवर फुलांचा वर्षाव केला जात आहे, तर दुसरीकडे मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवला जात आहे.

तुम्ही बघा, गणवेशातील पोलिस अधिकारी यात्रींवर मालिश करत आहेत, तर तोच पोलिस मुस्लिम मुलांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन काठ्यांनी त्याची मालिश करत आहे. मुस्लिमांसोबत एवढा भेदभाव का, असे ओवेसी म्हणाले. अमरोहा येथील एक मदरसा पाडण्यात आला मात्र ही जमीन ग्रामसभेकडून मिळाली होती.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, रामपूरमध्ये मुस्लिम मुलाचे काय झाले, प्रयागराजमधील घर त्यांच्या पत्नीच्या नावावर होते, ते पाडण्यात आले. तुम्हाला नुसती शंका आली तरी तुम्ही घर तोडून टाकणार. शिक्षा देण्यासाठी कायदा आहे. ओवेसी म्हणाले, तुम्ही टेनीचे घर का फोडत नाही. तुम्ही तिथेही बुलडोझर पाठवा, घर फोडा, आमची चूक सिद्ध करा.

रस्त्यावर काही मिनिटे नमाज पढल्यास काय दंगा होईल, असे ओवेसी म्हणाले. उद्यानात काय चालले आहे ते तुम्हाला दिसेल. अलीगड लॉ कॉलेजमधील एका प्राध्यापकाला नमाज पठणासाठी रजेवर पाठवण्यात आले होते. मी असे म्हणत नाही की कोणी रस्त्याच्या मधी येऊन नमाज वाचायचं किंवा कोणी व्हीआयपी मुव्हमेंट बंद करेल, पण काही मिनिटे नमाज वाचाल्यानी काय होईल. लखनऊच्या मॉलमध्ये नमाज अदा केल्यानंतर काय झाले होते. ओवेसी म्हणाले, मुस्लिमांसोबत भेदभाव का?

महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! उत्तर प्रदेशातील मदरशांचे सरकारी अनुदान रद्द होणार, योगी सरकारने घेतला निर्णय
योगी सरकारने घरबसल्या दारू पिण्यावर-पाजण्यावर दिली सुट, जाणून घ्या नवीन नियम
योगी सरकारचं मुंबईत कार्यालय होणार, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रसुद्धा लवकरच अयोध्येत आणि..

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now