कोरोनाचा उद्रेक: गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांनी गाठला धक्कादायक आकडा

नवी दिल्ली | कोरोनामुळे राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे सरकार अनलॉक २ च्या माध्यमातून काही प्रमाणात सवलतीही देत आहेत.

मात्र याचा परिणाम उलट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २२ हजार ७७१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा हा २० हजारांच्या पुढे जात आहे. देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही ६ लाख ४८ हजार ३१५ झाली आहे. तर, २४ तासांत ४४२ जणांचा मृत्यू झाला.

देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६३६४ नवीन रुग्णांची नोंद झाली. हा एक दिवसातला सर्वाधिक आकडा आहे.

यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९० झाला आहे. तर, २४ तासांत १९८ लोकांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा आकडा ८३७६ झाला आहे.

तर दुसरीकडे दिल्लीत सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट ६९.३ टक्के आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.