आमचे साहेब जखमींना आणि आजारी व्यक्तींना औषध आणि रेशन नव्हे तर भाषण देतात

 

मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह सीमारेषेवर जाऊन जवानांचे मनोबल वाढवले आहे. जवानांना अनपेक्षित भेट देऊन मोदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

दरम्यान जेएनयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कन्हैया कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींना टार्गेट केले आहे.

“आमचे साहेब जखमींना आणि आजारी व्यक्तींना औषध आणि रेशन नव्हे तर भाषण देतात”, असे टीकात्मक ट्विट कन्हैया कुमार यांनी केले आहे.

कन्हैया कुमार यांनी यापूर्वी देखील नोटबंदी, जीएसटी यांसारख्या विषयांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली होती.

“लडाखची परिस्थिती सर्वांना माहित आहे. पण मतदारांना खूश करण्यासाठी भाषण चांगलं होतं आहे”, अशा शब्दात कन्हैया कुमार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

“मोदींच्या येण्याने टीव्हीवर रौनक येते. आणि टीव्ही अँकर बॉर्डरवरील परिस्थिती चांगली असल्याचं सांगतात”, असे म्हणत कन्हैया यांनी टीव्ही अँकरना देखील फटकारले आहे.

लेह सीमेवरील दिलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैनिकांचे कौतुक केले होते. “तुम्ही आज ज्या उंचीवर तैनात आहात त्यापेक्षा कितीतरी अधिक तुमच्या शौर्याची उंची आहे.

तुमच्या शौर्यामुळे आज देशातील नागरिकांची छाती अभिमानाने फुलली आहे”, असे म्हणत जवानांच्या अंगात नवी ऊर्जा भरून त्यांचे मनोबल वाढवले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.