‘नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आमचे घर चालत नाही’; मोदींच्या भावाची मोदींवर टीका

गुजरातमध्ये येत्या २१ आणि २८ फेब्रूवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नेत्यांच्या नातेवाईकांना, वयाची ६० वर्ष पुर्ण असलेल्या व्यक्तींना तिकीट देण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केल्याने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या मुलीला भाजपने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने प्रल्हाद मोदी यांनी नाराजी व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत.

एका चॅनलने घेतलेल्या मुलाखतीत प्रल्हाद मोदी म्हटले की, माझी मुलगी सोनल ही बोडकदेव येथून निवडणूक लढवण्यास इच्छूक असून आम्ही नरेंद्र मोदींचे नातलग असल्याने भाजपने तिला तिकीट दिले नाही. पण नरेंद्र मोदी यांच्यामुळे आमचे घर चालत नाही. तर आम्ही कष्ट करून घर आमचे घर चालते. नरेंद्र मोदी घर सोडून गेल्यानंतर संपुर्ण देशाला त्यांनी आपलं कुटुंब बनवलं आहे. नरेंद्र मोदी नेहमी म्हणत असतात की सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत. नरेंद्र मोदींचा जन्म आमच्या घरात झाला असला तरी आमच्या घरातील रेशनकार्डावर त्यांचे नाव नाही. मी अजूनही पंतप्रधानाच्या घराचं दारही पाहिलं नाही आणि मग माझ्या मुलांना कसं माहिती असेल. असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी जेव्हा येतात तेव्हा ते फक्त आईला भेटतात. गेल्या काही दिवसांचे फोटो पाहिल्यास त्यांना आईशिवाय कोणीचं नसल्याचं लक्षात येईल. त्यांना कुटुबाची गरज नसल्याचं मला वाटत आहे. आमचा भाऊ देशाचा पंतप्रधान असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र कधीही आम्ही त्याचा फायदा घेतला नाही आणि पुढेही कधी घेणार नाही.

पक्षाचा नियम सर्वांसाठी सारखाच तर….

पक्ष जो नियम बनवतं असतो तो नेते, त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते या सर्वांना समान असतो. राजनाथ सिंह यांचा मुलगा संसदेचा सदस्य बनु शकतो, अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा क्रिकेटमध्ये काही योगदान नसताना बीसीसीआयच्या सचिवपदी नियुक्ती केली जाते. त्यांना जर भाजप पात्र नसतानाही जबाबदाऱ्या देतात तर भाजपची ही भुमिका दुटप्पी आहे. माझी मुलगी नरेंद्र मोदींची पुतणी आहे, म्हणुन नव्हे तर आश्वासक नेता होण्याची तिची पात्रता आहे, विजयाची आशा असेल तर पक्षाने तिला तिकीट द्यायाला हवं. असं माझं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पॉर्न स्टार मिया खलिफा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो पोस्ट करुन म्हणतीये….
दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग भडकली, म्हणाली..
क्रुरतेचा कळस! बॉयफ्रेंडचा मर्डर करून त्याच्या शरीराचे तुकडे करून बनवली बिर्याणी
नामांतराच्या मुद्यावरून मनसे आक्रमक, शिवसेना नेत्याची गाडी अडवत विचारला जाब

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.