सुशांतप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री राजेश टोपे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाचा आदेश मानावाच लागतो. यापुढे काय निर्णय घ्यायचा ते सरकारमधील उच्च अधिकारी ठरवतील, असे टोपे यांनी म्हटलंय.

तसेच ‘महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, न्याय आणि संघर्ष करणारं राज्य आहे. राज्याने कधी कोणावर अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे,’ असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे” असे मत व्यक्त केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.