पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला विरोध, हिंसक आंदोलनात ४ आदोलकांचा मृत्यू

ढाका | पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देश बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांग्लादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या विरोधात ढाकामध्ये संघटनांनी आंदोलन केले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ढाका शहरात शुक्रवारी नमाजानंतर हिफाजत-ए-इस्लाम संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आणि त्यांनी मोर्चा काढला. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यानंतर पोलिस आणि मोर्चा काढलेल्या संघटनेमध्ये जोरदार वाद झाला.

यावेळी जमावाने आक्रमक होत पोलिस स्टेशनची तोडफोड केली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला आणि यामध्ये ४ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जमावाला शांत करण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला आहे.

बांग्लादेशातील हिफाजत-ए-इस्लाम सारख्या अनेक संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या संघटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिफाजत-ए-इस्लाम संघटना भारत विरोधी आणि हिन्दु विरोधी संघटना असल्याचं बोललं जात आहे. ही संघटना पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नरेंद्र मोदींचा विरोध करत असल्याचं सोशल मिडिया युजर्स बोलत आहेत.

दरम्यान सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात मोदींनी भाषण केले ते म्हणाले की, मी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतो. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी सत्याग्रह केला होता. मला अटकही झाली होती. असं वक्तव्य केल्याने मोदींविरोधात देशात टीका करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
लक्षात ठेवा! ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा
सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा मोदी सरकारला टोला, घराबाहेर लावला ‘हा’ फलक
अखेर सचिन वाझेनी दिली गुन्ह्याची कबुली म्हणाला, सारं मीच केलं; कारण….
बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी सत्याग्रह केला होता; मला अटकही झाली होती – नरेंद्र मोदी

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.