कोरोनाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना द्याव्यात; उगाच विरोध करू नये- राजेश टोपे

मुंबई | सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहेत. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांकडून वारंवार टीका करण्यात येत आहे.

त्यामुळे, राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध करु नये. असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल. तसेच, राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे काम सुरु आहे. असेही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वाढती रुग्णसंख्या हा जरी काळजीचा विषय असला तरी मृत्यूदर वाढू नये, याची काळजी सरकार घेत आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजनांवर भर देत आहोत.

दरम्यान, अनेक ठिकाणी रुग्णवाहिका कमी पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात ५०० नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

तसेच, खासगी हॉस्पिटल रुग्ण तपासात नसल्याच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत. रुग्णालयात अँटीजेन टेस्ट किट ठेवाव्यात आणि त्यांनी रुग्ण तपासणी करावी. असे न केल्यास रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी गय करू नये, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.