आठवड्याभरातच दीड हजार रुपयांनी सोनं स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव

नवी दिल्ली | भारतात महिलांना सोन्याविषयी जास्त आकर्षण आहे. अशात जागतिक महिला दिनाच्या दिवशीच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी १० ग्रॅम सोन्याचे भाव १२२ रुपयांनी घसरले आहेत.

सोमवारी सोने प्रति १० ग्रॅम ४४,२३६ रुपयांवरून ४४,११४ रुपयांपर्यंत कमी झाले आहे. तसेच जागतिक मागणीत वाढ झाल्याने  दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीचे दर ५८७ रुपयांनी वाढून ६५,५३४ रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. अशात सोने खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

सोने गेल्या आठ महिन्यांत तब्बल १२,०८६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामध्ये आठवड्यात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १४६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आगामी काळातही दरात मोठी घसरण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने  सोन्याची इम्पोर्ट ड्यूटी अडीच टक्क्यांनी कमी केली आहे. त्याच्या थेट परिणाम दर कमी होण्यात दिसून येतो. याशिवाय डॉलर इंडेक्सही दर कमी होण्यामागचे एक कारण आहे. गुंतवणूकदारांचा कल बिटकॉईन आणि इक्विटीकडे आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे म्हटले जाते आहे.

महत्वाच्या बातम्या-
बापरे! अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पहा व्हिडीओ
VIDEO: ‘सोपं असतं तर प्रत्येकजण शेतकरी असता’, आनंद महिंद्रांचा महिला ‘शक्ती’ला अनोखा सलाम
काय सांगता! आता भांडी घासण्यासाठी ‘ऑनलाईन’ विकली जातेय ‘चुलीतली राख’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.