लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीत मिळणार बाल पैलवानांना संधी; ‘या’ तारखेला होणार मेगाभरती

बेळगाव। बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉइज स्पोर्ट्स कंपनीतर्फे लष्करात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.या भरती प्रक्रियेत कुस्ती प्रकारातील खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे.

८ ते १४ वयातील मुले या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. २७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे ही भरती होणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील तरुणांना संधी मिळणार आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. लष्करात भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेले प्रमाणपत्र जिल्हा स्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात सादर करावे लागेल.

तसेच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल होऊ शकतात.

त्याचबरोबर लष्करात भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेले प्रमाणपत्र जिल्हा स्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात सादर करावे लागेल. या प्रक्रियेत जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

लष्करात भरती झालेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत शिक्षण तसेच एससएआयमार्फत कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा वैद्यकीय केंद्र आणि बॉइज कंपनी ही निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी पुढील कागदपत्रे महत्वाची आहेत. उमेदवाराची जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, शिक्षण दाखला, गुणपत्रिका, सरपंच किंवा शाळेकडून मिळालेला चारित्र्याचा दाखला, तहसीलदार/जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून जारी केलेली निवासी पत्त्याचे प्रमाणपत्र, दहा रंगीत छायाचित्रे व आधार कार्ड, जिल्हा, राज्य किंवा राष्ट्र पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागाची प्रमाणपत्रे इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी’, शरद पवार यांचे खडे बोल 
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या इको कारला भीषण अपघात; १० जण गंभीर जखमी
पित्याने जुळ्या पोरांसह मृत्यूला कवटाळले, पत्नीनेही दीड महिन्यापूर्वीच गळ्याला फास आवळले..
इंडीयन आर्मीसाठी टाटा बनवणार लढाऊ विमाने; अखेर सरकारने टाटांवरच विश्वास टाकला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.